Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NFO Alert: HDFC म्युच्युअल फंडने लाॅंच केलाय फार्मा आणि हेल्थकेअर फंड, 28 सप्टेंबरपर्यंत करता येणार गुंतवणूक

NFO Alert

Image Source : www.hdfcbank.com

NFO Alert: अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी HDFC म्युच्युअल फंडने फार्मा आणि हेल्थकेअर फंडमध्ये न्यू फंड ऑफरची (NFO) घोषणा केली आहे. हा फंड सबस्क्रिप्शनसाठी 14 सप्टेंबरपासून खुला करण्यात आला आहे. तर या फंडात गुंतवणुकादार 28 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करु शकणार आहेत. चला तर या फंडविषयी सविस्तर जाणून घेऊया.

अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी HDFC म्युच्युअल फंडने आता फार्मा आणि हेल्थकेअर (HDFC Pharma and Healthcare Fund) सेक्टरमध्ये जम बसवणायाची तयारी केली आहे. यासाठी कंपनाने फार्मा आणि हेल्थकेअर फंडमध्ये  न्यू फंड ऑफर (NFO) आणला आहे. ही एक ओपन एंडेड योजना आहे.  

तसेच, कंपनीचा उद्देश या फंडद्वारे फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलात वाढ करायचे आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरु शकते. 

तसेच, गुंतवणुकदार कधीही या फंडातून पैसे काढू शकणार आहेत. या फंडात गुंतवणूक करायची असल्यास, गुंतवणुकदाराला कमीतकमी 100 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

या फंडात गुंतवणूक का करायची?

म्युच्युअल फंड हाउसनुसार, लाॅंग टर्ममध्ये ज्याना गुंतवणूक करायची आहे. ते या योजनेत गुंतवणूक करु शकणार आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यावर गुंतवणुकदारांना फार्मा आणि हेल्थकेअर कंपनीच्या इक्विटी आणि इक्विटीसंबंधित उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

 तसेच, योजनेचा उद्देश हेल्थकेअर कंपनीत गुंतवणूक करुण चांगला नफा मिळवणे आहे. यामुळे तुम्ही या फंडात गुंतवणूक करु शकता. मात्र, या योजनेत कोणतीही हमी नाही. तुम्हाला या फंडात डायरेक्ट आणि SIP द्वारे गुंतवणूक करता येणार आहे. याशिवाय गुंतवणुकदारांना कमीतकमी या योजनेत 100 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तसेच, अधिक रक्कम गुंतवण्याला कोणतीही मर्यादा नाही.

कंपनीचा बेंचमार्क

अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी HDFC म्युच्युअल फंडच्या फार्मा आणि हेल्थकेअर फंड हा ओपन एंडेड स्कीमचा इंडेक्स फंड आहे. या फंडचा बेंचमार्क S&P BSE Healthcare index हा आहे. यामुळे कंपनी इक्विटी सेगमेंटमध्ये धमाका उडवण्याची अपेक्षा आहे.

...तर द्यावा लागेल एक्झिट लोड

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणताही एंट्री लोड देण्याची गरज नाही. मात्र, फंडात गुंतवणूक केलेल्या दिवसापासून तुम्ही एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास तुम्हाला 1 टक्का एक्झिट लोड द्यावा लागणार आहे. तसेच, तुम्ही या फंडात 28 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करु शकणार आहात.

कंपनीविषयी थोडक्यात

अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी HDFC म्युच्युअल फंडची स्थापना 10 डिसेंबर 1999 ला करण्यात आली आहे. तसेच, अ‍ॅसेट रॅकिंगमध्ये कंपनीचा भारतात 2 क्रमांक लागतो. सध्या मॅनेजमेंटच्या अंतर्गत 529450 कोटींची मालमत्ता आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)