आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी एचडीएफी म्युच्युअल फंडांने उपलब्ध केली आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडांचा एमएनसी फंड खुला झाला असून 3 मार्च 2023 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येईल. किमान 100 रुपयांपासून एमएनसी फंडांत गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. एक वर्षाच्या आत गुंतवणूक काढल्यास त्यावर 1% एक्झिट लोड लागू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (HDFC MNC Fund opens for Investment till 3rd March 2023)
किरकोळ गुंतवणूकदारांना मल्टी नॅशनल कंपन्यांच्या शेअरमध्ये थेट गुंतवणूक करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या विशिष्ट थिमवर आधारित योजनांमधून सरळ गुंतवणूक करता येते. एचडीएफसी म्युच्युअल फंडांने याच उद्देशाने एमएनसी फंडांची रचना केली आहे. दीर्घ काळात मल्टी नॅशनल कंपन्यांमधील गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एचडीएफसी एमएनसी फंड (HDFC MNC Fund) 17 फेब्रुवारी 2023 रोजी खुला झाला असून 3 मार्च 2023 रोजी बंद होईल.
ज्या गुंतवणूकदारांना दिर्घकाळात संपत्ती निर्माण करायची आहे अशांसाठी एचडीएफसी एमएनसी फंड चांगला पर्याया असल्याचा दावा एचडीएफसी म्युच्युअल फंडांने केला आहे. मल्टी नॅशनल कंपन्यांचे शेअर आणि शेअर्सशी संबधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, या योजनेत उच्च प्रकारची जोखीम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी अर्थ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
एचडीएफसी एमएनसी फंडांसाठी NIFTY MNC TRI हा बेंचमार्क आहे. या योजनेत रेग्युलर आणि ग्रोथ असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय ग्रोथ ऑप्शन आणि इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विथड्रॉवल (IDCW) हा पर्याय आहे. IDCW नुसार जमा होणाऱ्या बोनस युनिट्सवर आणि पुनर्रगुंतवणुकीवर प्राप्त झालेल्या युनिट्सवर एक्झिट शुल्क आकारले जाणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. एचडीएफसी एमएनसी फंडांचे व्यवस्थापन राहूल बैजल करणार आहेत.
अवघी 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता
एचडीएफसी म्युच्युअल फंडानुसार एचडीएफसी एमएनसी फंडात गुंतवणूकदार किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. किमान 100 आणि त्यापटीत गुंतवणूक करता येईल. येत्या 9 मार्च 2023 रोजी म्युच्युअल फंड युनिट्सचे वाटप होण्याची शक्यता आहे. ही इक्विटी योजना क्षेत्रनिहाय किंवा संकल्पनेवर आधारित आहे. या योजनेत 1% एक्झिट लोडचे शुल्क लागू होईल, असे कंपनीने म्हटले आहे. याचा अर्थ फंडात गुंतवणूक केल्यानंतर एक वर्ष मुदतीच्या आत यातून पैसे काढले किंवा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर 1% शुल्क गुंतवणूकदाराला अदा करावे लागणार आहे. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढल्यास त्यावर एक्झिट लोड लागू होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
काय आहे गुंतवणूक स्ट्रॅटेजी
एचडीएफसी एमएनसी फंडांत बॉटमअप अॅप्रोच अर्थात कमी किंमती खरेदी करण्याची स्ट्रॅटेजी वापरली जाणार आहे. 50% हून अधिक परकीय हिस्सेदारी असलेल्या मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये प्राधान्याने गुंतवणूक केली जाणार आहे. त्याशिवाय निफ्टी एमएनसी कंपन्यांना पोर्टफोलिओत स्थान दिले जाईल. किमान 30 शेअर्ससाठी गुंतवणूक रणनिती ठरवली जाणार आहे. पोर्टफोलिओतील 20% निधी हा भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवला जाईल. भक्कम ताळेबंद, सुशासन आणि चांगल्या कामगिरी करणाऱ्या बड्या कॉर्पोरेट्सवर या फंडाचे लक्ष असेल.
एमएनसी फंडांची कामगिरी
मागील 10 वर्षात एमएनसी फंडांने दमदार कामगिरी केली आहे. मल्टी नॅशनल कंपन्या या नाविन्यता, संशोधन आणि विकासाला चालना देतात. निफ्टी एमएनसी इंडेक्सने मागील 10 वर्षात निफ्टी 500 इंडेक्सच्या तुलनेत सरस कामगिरी केली. एमएनसी कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते. त्यामुळे त्यांच्यात नफा कमावण्याची क्षमता असते. निफ्टी एमएनसी इंडेक्समधील 17 कंपन्यांचा पीई हा एक वर्षाच्या कमी आहे. 12 कंपन्यांचा पीई दिर्घकाळातील सरासरीच्या तुलनेत कमी आहे. मात्र निफ्टी 500 आणि निफ्टी एमएनसी इंडेक्स दोन्ही निर्देशांकांनी वेगवेगळ्या परिस्थितीत दमदार कामगिरी केली आहे.