HDFC FD rate Hike: एचडीएफसी बँकेने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बँकेने वाढ केली आहे. दरवाढ केल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 3% ते 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% पर्यंत गुंतवणुकीवर व्याजदर मिळू शकतो. 7 दिवस ते 10 वर्ष कालावधीपर्यंत करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर नवे व्याजदर लागू होतील.
21 फेब्रुवारीपासून नवे दर लागू (HDFC new FD rates apply from 21 Feb 2023)
बँकेने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नवे व्याजदर कालपासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. 7 दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या मुदतठेवींवर बँकेकडून 3% व्याजदर देण्यात येत आहे. तर 30 दिवस ते 45 दिवसांपर्यंतच्या FD वर साडेतीन टक्के व्याजदर मिळेल. तर 46 दिवस ते 6 महिने कालावधीतील गुंतवणुकीवर 4.50% व्याजदर मिळू शकतो.
कालावधी | व्याजदर(वार्षिक) | जेष्ठ नागरिक दर |
7 - 14 दिवस | 3.00% | 3.50% |
15 - 29 दिवस | 3.00% | 3.50% |
30 - 45 दिवस | 3.50% | 4.00% |
46 - 60 दिवस | 4.50% | 5.00% |
61 - 89 दिवस | 4.50% | 5.00% |
90 दिवस < = 6 महिने | 4.50% | 5.00% |
6 महिने 1 दिवस ते 9 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी | 5.75% | 6.25% |
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी | 6.00% | 6.50% |
1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी | 6.60% | 7.10% |
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी | 7.10% | 7.60% |
18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी | 7.00% | 7.50% |
21 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी | 7.00% | 7.50% |
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्ष | 7.00% | 7.50% |
3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष | 7.00% | 7.50% |
5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष | 7.00% | 7.75%* |
सहा महिने एक दिवस ते नऊ महिन्यांपेक्षा कमी कालवधीतील मुदतठेवींवर 5.75% व्याजदर मिळेल. तर 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी कालवधीतील FD वर 6% व्याजदर मिळेल. तर 9 महिने 1 दिवस ते एक वर्ष कालवधीच्या FD वर 6.60% व्याजदर मिळेल. 15 महिने ते 18 महिन्यांच्या आतील मुदत ठेवींवर 7.10% व्याजदर मिळेल.
ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव दर (HDFC Bank senior citizen FD)
HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवींवर 3.50% ते 7.60% इतके व्याजदर देते. यातील 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक 7.60% इतका व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी HDFC बँकेने एक स्पेशल ऑफर आणली आहे. यामध्ये जास्त व्याजदर देण्यात येत आहे. याअंतर्गत 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 7.75% इतका व्याजदर मिळतो. कालमर्यादेच्या आत मुदत ठेवींमधील गुंतवणूक काढून घेतल्यास बँकेकडून दंडही आकारण्यात येतो.