Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Rate Hike : एचडीएफसी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने डिपॉझिटवरील व्याजदर वाढवला

FD rate Hike, Fixed Deposit Rate, Interest Rate,

HDFC Bank and Indian overseas banks hikes FD interest Rate :आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये काही रक्कम ही सुरक्षित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणे योग्य असते. एफडी हा यातला एक पर्याय आहे.

मुदत ठेव (एफडी) हा सुरक्षित परताव्यासाठी एक लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे. बचत खात्यापेक्षा (saving account) यात जास्त व्याज मिळते. मात्र हा फरकही 2 ते 3 टक्क्यापेक्षा जास्त नसतो. तरीही जोखमीचा विचार करता अनेकजण मुदत ठेव गुंतवणुकीस उत्सुक असतात. त्यांच्यासाठी ही  एक खूषखबर आहे. इंडियन ओवरसीज बँक आणि एचडीएफसी बँकेने ‘एफडी’वरील व्याजदरात वाढ केलेली आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेने मुदत ठेवींच्या सर्व कालावधीसाठी व्याजदर  वाढवले आहेत. सुधारित दरांनुसार, 7 दिवस ते 3 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या ठेवींवर 3.25% ते 5.85% पर्यंत व्याजदर मिळतील. आयओबीने डोमेस्टीक/एनआरओ  रिटेल मुदत ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के दराने 1000 दिवसांचा विशेष मॅच्युरिटी कालावधीसाठी प्लॅन सुरू केला आहे. इतरांसाठी, 6% टक्के इतका व्याजदर असेल.  यासाठी ठेवीची किमान रक्कम एक लाख रुपये आहे.  80 वर्षे आणि त्यावरील अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.75% व्याजदर अधिक राहील.

एचडीएफसी बँकेने केली एफडीच्या दरात वाढ (HDFC Bank Hike FD Rate)

एचडीएफसी बँकेनेही मुदत ठेवींच्या व्याजदरात 15 दिवसांच्या आत पुन्हा वाढ केली आहे. 7 नोव्हेंबरपासून हा दर लागू होणार असून 2 कोटीपेक्षा कमी रकमेसाठी हा दर लागू असेल. 7 ते 29 दिवसांसाठी 3 टक्के, 30 ते 45 दिवसांसाठी 3.50 टक्के, 46 ते 60 दिवसांसाठी 4 टक्के, 61 ते 89 दिवसांसाठी 4.50 टक्के, 90 दिवस ते 6 महिन्यापर्यंत 4.50 टक्के, 6 महिने 1 दिवसापासून ते 9 महिन्यापर्यंत 5.25 टक्के, 9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष 5.50 टक्के, 1 वर्ष 1 दिवस ते 15 महिने 6.10 टक्के, 15 महिने 1 दिवस ते 18 महिने 6.40 टक्के, 18 महिने ते 5 वर्षे कालावधीसाठी 6.50 टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ट नागरिकांना यातील प्रत्येक कालावधीसाठी 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल.