Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MRTA Protection For Loan: होम लोन घेतलंय का? मग MRTA विमा संरक्षण माहिती नसेल तर याल अडचणीत

Home Loan Insurance

जर कुटुंब प्रमुखाचे अकाली निधन झाले तर कुटुंबाचा मासिक खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडणे अवघड होऊ शकते. त्यामुळे होम लोन प्रोटेक्शन प्लॅन (Home Loan Protection Plan) गृह कर्जदाराकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. हा टर्म इन्शुरन्स सारखा काम करतो. जर कर्जदाराचे अकाली निधन झाले तर कर्जावर विम्याचे संरक्षण मिळते.

MRTA Protection For Loan: स्वत:चं घर घेणं हा जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो. अनेकजण आयुष्यभराची पुंजी नव्या घरासाठी खर्च करतात. घर खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने अनेकजण गृहकर्जाचा सहारा घेतात. अनेक वर्ष कर्जाचे हप्ते फेडून घराचं स्वप्न पूर्ण करतात. मात्र, आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. जर अचानक कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जाचे हप्ते कोण फेडणार?

जर कुटुंब प्रमुखाचे अकाली निधन झाले तर कुटुंबाचा मासिक खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडणे मुश्लिक होऊ शकते. त्यामुळे होम लोन प्रोटेक्शन प्लॅन (Home Loan Protection Plan) असणे अत्यंत गरजेचे आहे. हा एक प्रकारचा विमा प्लॅनच असतो. यानुसार जर कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे राहिलेले कर्ज विमा कंपनी फेडते. बँक किंवा ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असेल त्यांना कर्जाची राहिलेली रक्कम विमा कंपनीकडून दिली जाते. कुटुंबावर कर्ज फेडण्याची वेळ येत नाही. 

या प्रोटेक्शन प्लॅनला Mortgage Reducing Term Assurance असे म्हणतात. MRTA हा टर्म इन्शुरन्ससारखा काम करतो. प्युअर टर्म प्लॅननुसार जेव्हा पॉलिसीधारकाचा मृत्यू होतो तेव्हाच सम अॅश्युर्ड नॉमिनीला दिली जाते. त्यानुसार जर गृहकर्जदाराचा मृत्यू झाला तर त्याला MRTA नुसार संरक्षण मिळते. या प्लॅनला कोणतेही म्युच्युरिटी बेनिफिट (लाभ) नसतात.

MRTA प्लॅननुसार जी अॅश्युअर्ड रक्कम असते ती कर्जाचा कालावधी जसा कमी होत जाईल तशी कमी होत जाते. जसे तुम्ही गृह कर्जाचे हप्ते भरत जाता तसे कर्जाचा बोजा किंवा मॉर्गेज कमी झालेले असते. त्यामुळेच याच्या नावातच Mortgage Reducing असे आहे. 

MRTA प्लॅनचे फायदे काय आहेत?

ज्या बँका किंवा वित्तसंस्था ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देतात सहसा त्यांच्याकडे MRTA प्लॅन देणाऱ्या विमा कंपन्या जोडलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला प्रिमियमही थोडा कमी पडू शकतो. तसेच कागदपत्रे विमा कर्जावर विमा मिळण्याची प्रक्रिया जलद होते.

इतर होम लोन प्रोटेक्शन प्लॅनपेक्षा MRTA फायद्याचा ठरू शकतो. कारण, जसा गृहकर्जाचा बोजा कमी होतो तसे सम अॅश्युअर्ड देखील कमी होते. म्हणजेच समजा तुम्ही 30 लाख रुपयांचे गृहकर्जावर MRTA लोन प्रोटेक्शन प्लॅन घेतला आहे. जर 12 वर्षानंतर तुम्ही 16 लाख रुपये कर्ज चुकते केले असेल तर ऊर्वरित 14 लाखांसाठीच तुम्हाला संरक्षण मिळेल. तुम्ही MRTA प्लॅनसाठी एकरकमी विमा प्रिमियम भरू शकता. किंवा कर्जाच्या हप्त्यासोबतही रेग्युलर मोडने भरू शकता.

या प्लॅनअंतर्गत संयुक्त पद्धतीने कर्ज असेल तर दोघांनाही संरक्षण मिळते. जसे पती पत्नी, मुलगा, भाऊ किंवा इतर व्यक्तीसोबत मिळून कर्ज घेतले असेल तर दोघांनाही संरक्षण मिळते. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर कर्जदार बँक आणि विमा कंपनी हा दावा निकाली काढते. कर्जदाराचा सहभाग यात अल्प असतो.