Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST Meeting: ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी? जीएसटी कौन्सिल घेणार 11 जुलै रोजी निर्णय

GST Tax

GST Meeting: ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंग यासारख्या सेवांवर अद्याप जीएसटी लागू करण्यात आलेला नाही. गेल्या काही बैठकांमध्ये या तीन सेवांबाबत चर्चा देखील करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता.

वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक येत्या 11 जुलै रोजी 50 वी बैठक होणार आहे. 1 जुलै 2017 रोजी जीसएटी कर प्रणाली लागू करण्यात आली होती. तेव्हापासून जीएसटी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार जीएसटी कौन्सिलला देण्यात आले आहेत. आगामी बैठकीत ऑनलाईन गेमिंग आणि कर चुकवेगिरीबाबत कौन्सिलकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांमध्ये वस्तू आणि सेवा कर प्रणालीत बनावट नोंदणी करुन इनपुट टॅक्सचा लाभ घेतला जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आगामी बैठकीत कर चुकवेगिरीबाबत कौन्सिलकडून ठोस उपाययोजना हाती घेतली जाईल, असे मत अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभागाचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्यक्त केले.

ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंग यासारख्या सेवांवर अद्याप जीएसटी लागू करण्यात आलेला नाही. गेल्या काही बैठकांमध्ये या तीन सेवांबाबत चर्चा देखील करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता.

केंद्रीय मंत्रिगटाने ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंगबाबतचा अहवाल डिसेंबर 2022 मध्ये जीएसटी कौन्सिलला सुपूर्द केला होता. मात्र अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लागू करण्याची शक्यता आहे.

बनावट जीएसटी नोंदणी आणि जीसएटी कर चोरीबाबत जीएसटी विभागाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. जीएसटी नेटवर्कने आतापर्यंत 60000 कंपन्यांवर कारवाई केली आहे. त्याशिवाय स्थानिक पातळीवर जीएसटी विभागाकडून संशयित कंपन्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

जीएसटी विभागाने आतापर्यंत केलेल्या तपासात 43000 कंपन्यांची छाननी करण्यात आली. त्यातील 10000 कंपन्यांची नोंदणी बनावट असल्याचे निदर्शनात आल्याचे जोहरी यांनी सांगितले.

मे महिन्यात जीएसटी संकलन वाढले

मे महिन्यात जीएसटी महसूल संकलन 1,57,090 कोटी रुपये झाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. जीएसटीच्या महसूल संकलनात एका वर्षाच्या कालावधीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली. मे महिन्यात एकूण महसुलात 28411 कोटी रुपये सीजीएसटी म्हणून सरकारला मिळाले. मागच्या महिन्यात 35828 कोटी रुपयांचा एसजीएसटी जमा झाला. आयजीएसटी महसूल 81363 कोटी रुपये होता. ही 41772 कोटी रुपयांच्या वस्तूंच्या आयातीवरच्या संकलनासह असलेली आकडेवारी आहे. या व्यतिरिक्त 11,489 कोटी रुपयांचा उपकर जमा झाला. यामध्ये वस्तूंच्या आयातीवरचा 1,057 कोटी रुपयांच्या संकलनाचा देखील समावेश आहे.