इलेक्ट्रिकल केबल उद्योगातील असंघटित कंपन्या रिसायकल केलेले तांबे आणि पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) वापरून दीर्घकाळापासून GST चुकवत आहेत. स्थानिक बाजारपेठेत अशा कंपन्या निकृष्ट दर्जाची उत्पादने कमी किमतीत विकून चांगली कमाई करत आहेत. यामुळे सरकारचे नुकसान होत आहे, असे विश्लेषण केले जात आहे.
तज्ञांचे म्हणणे आहे की, देशभरातील व्यावसायिक आणि निवासी इमारतींमध्ये विद्युत आग लागण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. याला असंघटित क्षेत्र जबाबदार आहे. या उद्योगात असंघटित कंपन्यांचा वाटा 35% आहे. याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. बिल्डिंग वायर मार्केट सुमारे 20 हजार कोटी आहे, परंतु त्यापैकी बहुतेक पीव्हीसी किंवा एफआरएलएस इन्सुलेटेड वायर विकतात जे उत्तम पर्याय नाही, असे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे.
GST म्हणजे काय ?
GST म्हणजे Goods and Services किवा वस्तू आणि सेवा कर. वस्तू आणि सेवा म्हणजे काय तर जनरली ज्या गोष्टी भौतिकरीत्या आपण बघू शकतो आणि विकत घेऊ शकतो त्या गोष्टी वस्तू(Goods) मध्ये मोडतात. उदाहरणार्थ कपडे, परफ्युम, शर्ट इत्यादी. तसेच ज्या गोष्टींचा आपण उपभोग घेतो परंतु कायमस्वरूपी खरेदी करत नाही अशा सेवा(Services) यामध्ये मोडतात. यामध्ये जसे कि हॉटेल, पर्यटन, वाहतूक, इ.
वस्तू किंवा सेवा यातली कुठलीही गोष्ट जेव्हा आपण खरेदी करतो किंवा वापरतो तेव्हा त्याचा कर सरकारला द्यावा लागतो. कर रूपाने वसूल झालेला पैसा सरकारच्या तिजोरीत जात असतो. सरकार हा पैसा विविध योजनांमध्ये वापरत असते. जसे कि रस्ते, रोजगार हमी योजना, धरणे, इ. वस्तू आणि सेवा कर कायदा हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या करालाच जी.एस.टी (GST) Goods and Services Tax म्हणून ओळखले जाते. हा कायदा 1 जुलै 2017 पासून अमलात आणण्यात आला आहे. GST साठी भारतीय संविधानात दुरुस्ती देखील केली जाणार आहे. हा कायदा VAT(Value Added Tax) ला रिप्लेस केला आहे.