Groww UPI: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी Groww अॅप अनेकजण वापरतात. आता ग्राहकांना या अॅपवरुन युपीआय पेमेंट देखील करता येणार आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून तसेच मोबाइल नंबरद्वारे ग्राहकांना पेमेंट करता येईल.
पेमेंटच्या इतर सुविधा
सोबतच ग्रो अॅपवरुन वीज बील, पाणी बील फास्ट टॅग पेमेंट, मोबाइल रिचार्ज, डीटीएच, लोन रिपेमेंटसह इतरही अनेक सुविधा वापरता येतील. सोबतच क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्याची सुविधाही या अॅपवर उपलब्ध आहे.
तत्काळ कर्जाची सुविधाही उपलब्ध
फायनान्शिअल सर्व्हिस क्षेत्रातील ग्रो कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी ग्रो अॅपवर तत्काळ पर्सनल लोनची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली. तीन ते पाच महिन्यांसाठी 5 लाखांपर्यंत तत्काळ लोन मिळण्याची सुविधा आहे. बिगर वित्तसंस्था आणि पेमेंट अॅग्रिगेटरचे लायसन कंपनीला आरबीआयकडून मिळाले आहे.
मागील वर्षी ग्राहकांना क्रेडिट/डेबिट कार्ड आणि बचत खात्याची सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न होता. त्यासाठी फेडरल बँकेसोबत मिळून काम करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र, नंतर हा प्लान कंपनीने रद्द करत पेमेंट आणि लोन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.
भारतामध्ये यंग गुंतवणुकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रो, अपस्टॉक्स सारख्या कंपन्यांनी या मार्केटकडे लक्ष केंद्रित केले आहे. गुंतवणूक सेवा देण्याबरोबरच ग्राहकांना आणखी सेवा देण्याचा प्रयत्न या फिनटेक कंपन्यांचा आहे. अॅपवरील अॅक्टिव्ह युझर वाढवण्यासाठी नवीन सेवा लाँच करण्यात येत आहेत. ग्रो कंपनीकडे सध्या 1 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. यातील सुमारे 50 लाख अॅक्टिव्ह युझर्स आहेत.