Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Grow Your Business : व्यवसाय मंदावला आहे? ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरतील या '5' टिप्स

Grow Your Business

Image Source : www.thebetterindia.com

Business Tips: कुठलाही व्यवसाय करतांना ग्राहक हा सर्वात महत्वाचा भाग असतो. ग्राहकांना टिकवून (Retain customers) ठेवण्याच्या दृष्टीने व्यवसायात पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी ग्राहकांसोबत व्यावसायिक संबंध जोडणे अतिशय महत्वाचे असते. आपण मानसिक दृष्ट्याही ग्राहकाला आपल्या व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. यासाठी खालील उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील.

ग्राहकांना टिकवून ठेवणे हे लहान-मोठ्या उद्योगाचे प्रथम उद्दिष्ट असते. ग्राहक अनेकदा खरेदी केलेल्या वस्तूची गुणवत्ता आवडल्यास तोंडी व्यवसायाची जाहिरात करतात. यासाठी ग्राहकांना बोलण्यात गुंतवणे,सतत त्यांचा अभिप्राय घेणे व ग्राहकांच्या अधिक मागणीनुसार बदल करणे हे व्यावसायिकासाठी महत्वाचे असते. व्यवसायात प्रगती करण्यासाठी हे मार्ग उपयुक्त ठरतील. अशाच काही व्यवसायिकांसाठी गरजेच्या उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

विश्वास निर्माण करा (Build Trust)

एका अहवालानुसार 70 टक्के ग्राहक त्यांचा विश्वास असलेल्या ब्रँडवर पैसे खर्च करणे पसंत करतात. एक निष्ठावान ग्राहक तयार करण्यासाठी विश्वास संपादन करणे गरजेचे असते. तसेच किंमत व वस्तूचे वजन याबाबत ग्राहकाला कधीही तक्रार करण्याची वेळ येऊ नये ही व्यवसायिकाची जबाबदारी असते.यावेळी व्यावसायिकाने उत्कृष्ट उत्पादने व सेवा देणे गरजेचे आहे.

तत्काळ सेवा (Immediate Service)

व्यवसायात ग्राहकाच्या मागणीतील वस्तू किंवा सेवा विलंब न करता वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. जेव्हा एखाद्या व्यवसायात मागणीची पूर्तता होण्यासाठी ग्राहकाला बरीच वाट बघावी लागते तेव्हा ग्राहक व्यावसायाकडे दुर्लक्ष करतात आणि दुसरी वाट निवडतात. मात्र ग्राहक यावेळी व्यवसायाला चुका सुधारण्यासाठी एक संधी देतात यामुळे व्यावसायिकाने आपल्या शैलीत बदल केला पाहिजे.  

प्रभावी जाहिरात करा (Advertising)

डिजिटल किंवा फ्लेक्स मार्केटिंगपेक्षा नेहमी ग्राहकांनी तोंडी केलेल्या जाहिरातीला सर्वोत्तम मानले जाते. ग्राहक आपला अनुभव इतरांशी सामायिक करतात आणि यातून नवीन ग्राहक जोडले जाण्याची शक्यता वाढते. तसेच ग्राहक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी व्यवसायिकाने ग्राहकांच्या मागणीनुसार बदल करणे गरजेचे असते. यामुळे जाहिरातीला व्यवसायात एक प्रमुख पैलू म्हणून ओळखले जाते. 

आदरपूर्वक वागणूक (Respectful Behavior)

आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत व्यवसाय टिकून राहण्यासाठी ग्राहक टिकवून ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा व्यवसायातील वस्तूंचे ग्राहकांशी भावनात्मक संबंध असतात. यावेळी त्यांच्या भावनांचा आदर करण्यासाठी व्यवसायिकाने किंवा कर्मचाऱ्यांनी आपली वागणूक आदरयुक्त ठेवली पाहिजे.  

ग्राहकांचे समाधान (Customer Satisfaction)

 व्यवसायातील वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर ग्राहकाचे समाधान झाले पाहिजे. यासाठी योग्य गुणवत्ता असलेल्या व ग्राहकांचे चांगले पुरवलोकन असलेल्या उत्पादनांची विक्री आपण केली पाहिजे. यावेळी किंमत हा देखील महत्वाचा घटक आहे. कारण जास्त किमतीची वस्तू निकृष्ट असल्यास ग्राहक ती वस्तू पुन्हा खरेदी करू इच्छित नाही यामुळे नेहमी ग्राहकांचे समाधान होईल अशा गोष्टींची विक्री करणे गरजेचे आहे.

“ग्राहक जेव्हा वस्तू खरेदी करण्यासाठी येतात तेव्हा त्यांची मागणी व वेळेनुसार वस्तू उपलब्ध असणे गरजेचे असते जसे की गुडीपाडवा या सणातील मागणीनुसार साखरेची माळ व जेवणात लोक गोड वस्तूंचा लोक समावेश करतात यासाठी वाढीव मागणीसाठी अतिरिक्त गूळ, श्रीखंड व सुका मेवा यांसारख्या वस्तू योग्य प्रमाणात उपलब्ध असले पाहिजे. तसेच लोक ब्रँड बघून वस्तू खरेदी करणे पसंत करतात. स्थानिक उत्पादन असल्यास ग्राहकांना तशी सवलत अपेक्षित असते.” विकास पाटील (व्यावसायिक)