Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Claim Complaints: विमा पॉलिसीची किचकट भाषा तुम्हाला समजते का? फसवणूक टाळण्यासाठी हे जरुर वाचा

Insurance Claim Complaints

कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करताना तुमच्या लक्षात आले असेल की कागदपत्रात लिहलेल्या नियम अटींची भाषा अत्यंत कठीण आणि किचकट असते. सर्वसामान्य ग्राहकाला त्या समजत नाहीत. पॉलिसीचे सर्व नियम अत्यंत सोप्या भाषेत असावेत. ग्राहक न्यायालयात सध्या साडेपाच लाख तक्रारी प्रलंबित आहेत. यातील सुमारे दीड लाख तक्रारी विविध विम्याशी संबंधित आहेत.

वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री हा अव्याहत चालणारा व्यवहार आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते. जर ग्राहक सजग, सतर्क नसेल तर त्याला कंपनीकडून काहीही उत्तर देऊन शांत बसवता येते. अनेक वेळा फसवणूक होत आहे, हेच ग्राहकाला समजत नाही. ग्राहक न्यायालयात सध्या साडेपाच लाख तक्रारी प्रलंबित आहेत. यातील सुमारे दीड लाख तक्रारी विविध विम्याशी संबंधित आहेत. तसेच या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विमा पॉलिसीच्या नियम अटी किचकट असल्यामुळेही अडचणी निर्माण होत आहेत.

एजंटकडून माहिती लपवली जाते (Insurance agent hides details of policy)

आरोग्य विमा, जीवन विमा आणि तरही अनेक प्रकारच्या विम्याचे कवच घेताना ग्राहकांनी सखोल चौकशी केली पाहिजे. नुकतेच केंद्र सरकारनेही विमा कंपन्या आणि IRDAI ला याबाबत निर्देश दिले आहेत. सरकारने सहा महत्त्वाचे मुद्दे पुढे मांडले आहेत. ग्राहकांची फसवणूक आणि त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विमा पॉलिसी खरेदी करताना ग्राहकाला खरी माहिती दिली जात नाही. पॉलिसीतील बारकावे, नियम अटी नीट सांगितले जात नाहीत, त्यामुळे तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

कोणत्या सहा मुद्द्यांवर सरकारने लक्ष वेधले? (Six major concerns in Insurance policy)

most-complaints-related-to-insurance.jpg

विमा कागदपत्रांमधील किचकट भाषा आणि अस्पष्टता, विमा कार्यकाळ, विमा प्रतिनिधीद्वारे ग्राहकांना पूर्ण माहिती न देणे, पूर्वीपासून असलेल्या आजारामुळे दावे रद्द होण्याची शक्यता, न्यायालयाच्या बाहेर वादाचे प्रकरण मिटवण्यासाठी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना असलेले अपुरे अधिकार आणि हक्क, पीक विम्याचे दावे केंद्रीय योजनांशी निगडीत असून त्यामध्ये लवचिकता नाही, या महत्त्वाच्या सहा मुद्द्यावर लवकर तोडगा काढण्याचे निर्देश सरकारने IRDAI आणि विमा कंपन्यांना दिले आहेत.

एकूणच देशात विमा क्षेत्राशी संबंधित तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. जर विमा कंपन्यांनी आम्ही सांगितलेल्या अडचणींवर तोडगा काढला नाही तर भविष्यात यावर कठोर नियम तयार करू असे, ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार म्हणाले. विमा क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. आरोग्य, जीवन, प्रवास, गृह, कार, पीक, फायर इन्शुरन्स अशा सर्वच विमा पॉलिसीमधील तक्रारींचा ढीग वाढत आहे.

विम्याच्या अटी नियमांची भाषा किचकट (Complex language of Insurance terms)

कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करताना तुमच्या लक्षात आले असेल की कागदपत्रात लिहलेल्या नियम अटींची भाषा अत्यंत कठीण आणि किचकट असते. सर्वसामान्य वाचकाला त्या समजत नाहीत. पॉलिसीचे सर्व नियम अत्यंत सोप्या भाषेत असावेत. ग्राहकाला ते सहज समजावेत. पॉलिसीची कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय सही करू नये, याबाबत जनजागृतीची गरजही ग्राहक मंत्रालयाने व्यक्त केली.