Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugar Export : साखर निर्यातीवर बंदी आणण्याच्या तयारीत सरकार, जाणून घ्या काय आहेत कारणे ?

Sugar Price

10 नोव्हेंबर 2023 पर्यंत साखर साठ्याचे तपशील सरकारकडे जमा करायचे आहेत. साठेमारी रोखण्यासाठी काय उपापयोजना केल्या जाव्यात यावर सरकारी स्तरावर सध्या उहापोह सुरु आहे.1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामात साखर निर्यातीवर बंदी लागू केली जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

यंदा समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आहे. शेती मालाचे भाव तर आधीच गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. अशातच नेमक्या सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव वाढले आहेत. देशांतर्गत साखरेचे उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सध्या साखरेचा असलेला साठा संपत आला असून, नव्या गाळप हंगामात किती साखरेचे उत्पादन निघेल हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देखील सावध पवित्रा घेतलेला दिसतो आहे. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर काही निर्बंध आणण्याच्या तयारीत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. असे झाल्यास देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत राहू शकेल आणि भाववाढ रोखण्यास मदत मिळू शकेल.

साखरेचा साठा जाहीर करण्याचे आदेश 

याच प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्र सरकारने देशभरातील साखर उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि वितरक यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साखर मालाचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

10 नोव्हेंबर 2023 पर्यंत हे तपशील सरकारकडे जमा करायचे आहेत. साठेमारी रोखण्यासाठी काय उपापयोजना केल्या जाव्यात यावर सरकारी स्तरावर सध्या उहापोह सुरु आहे.1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामात साखर निर्यातीवर बंदी लागू केली जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

साखरेची भाववाढ किती?

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यावर्षीच्या सुरुवातीला साखरेचे दर 41.45 रुपये प्रति किलो इतके होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे दर 43.84 रुपये प्रति किलो इतके नोंदवले गेले होते. गणेशोत्सव नंतर येणारी नवरात्री, दिवाळी अशा सणासुदीत साखरेला मोठी मागणी असते.

साखरेच्या भाववाढीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते साखरेचे भाव आणखी 6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकार निर्यातीवर निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.