कलाकारांना उतारवयात अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. स्थिर उत्पन्न नसल्यामुळे त्यांचा विमा देखील काढण्यात येत नाही हे लक्षात घेऊन सरकारने कलाकारांना आर्थिक मदत व्हावी म्हणून योजना आणली आहे यामार्फत वृद्ध कलाकार मंडळीला पेन्शन देखील देण्यात येते. जाणून घेऊया काय आहे ही योजना.
कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही सरकारद्वारे ही योजना सादर करण्यात आली आहे. हलकीची परिस्थिती असतांना अनेकांना वैद्यकीय खर्च परवडत नाही. कलाकार व कुटुंबाला या योजनेतून विम्याचा लाभ देखील घेता येणार आहे.
Table of contents [Show]
राष्ट्रीय कलाकार पेन्शन फंड
1. राज्य सरकारद्वारे मासिक भत्ता प्रति लाभार्थी किमान रुपये 500/- प्रतिमहिना असतो.
2. केंद्र सरकारद्वारे कलाकारांना मासिक भत्ता म्हणून कमाल प्रति लाभार्थी प्रति महिना रु.3500/- दिले जातात.
3. अर्जदार व्यक्तीला प्रति महिना 4000 रुपये इतका भत्ता मासिक पेन्शन म्हणून मिळतो.
राष्ट्रीय कलाकार वैद्यकीय मदत निधी
1. लाभार्थी कलाकारांना आणि त्यांच्याजोडीदाराच्या आरोग्य विमा संरक्षण मिळविण्याचा खर्चत्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून केला जातो.
2. कल्चर स्कीम मॉनिटरिंग सिस्टम (CSMS) http://csms.nic.in/login/index.php www.indiaculture.gov या वेबसाइटवर नोंदणी/लॉगिन पेजच्या सहाय्याने अर्ज ऑनलाइन केला जाऊ शकतो. 'एमओसी स्कीम्स अॅप्लिकेशन' हा पर्याय निवडून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
पात्र कलाकार त्यांचे अर्ज खालील आवश्यक कागदपत्रांसह सादर करू शकतात. संबंधित राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून दरमहा किमान रु. 500/- पेन्शन मिळेल. राज्यातर्फे या अर्जाला मंजूरी मिळाल्यावर केंद्र सरकारकडे शिफारस केली जाईल. दोन्ही सरकारने या अर्जावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे
- वैद्यकीय मदत व पेन्शन योजनेचा अर्ज
- राज्य सरकारकडून अर्जाची शिफारस
- बँक खाते माहिती पत्र
- 48000 हजरांपेक्षा कमी उत्पन्न प्रमाणपत्र
- जीवन प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- बातमी पुरावा (पेपर कटींग्ज)