Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pixel 6a Offers: पहा, 43,999 रूपयांचा मोबाईल फक्त 29,999 रूपयांमध्ये उपलब्ध

Google Pixel 6a Offers

Image Source : http://www.digit.in/

Google Pixel 6a Offers: नवीन वर्षात खास मोबाईल खरेदी करण्याचा विचार आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अगदी स्वस्तात मस्त मोबाईल. ते ही चांगल्या ऑफरमध्ये. जो तुम्हाला 43,999 रूपयांचा मोबाईल फक्त 29,999 रूपयांमध्ये मिळेल. जाणून घ्या, त्या मोबाईलचे नाव, किंमत व फीचर्स

Google Pixel 6a Offers: तुमच्यासाठी Pixel 6a हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 43,999 MRP ऐवजी फक्त 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. पण, इतक्या कमी किमतीत फोन खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. या फोनची थोडक्यात माहिती जाणून घ्या. 

काय आहे ऑफर

Google Pixel 6a हा मोबाईल बाजारात 43,999 रुपयात आहे, पण ऑफरमध्ये तुम्हाला हा मोबाईल फक्त 29,999 रूपयात मिळेल, 6GB+128GB सह. तुम्ही बँक ऑफ बडोदा कार्डधारक असल्यास, तुम्हाला Pixel 6a वर 2,000 रुपयांची सूट मिळू शकते आणि तुम्ही फेडरल बँकेचे कार्डधारक असल्यास, तुम्हाला 3,000 चा डिस्काउंट मिळेल. बँक ऑफर लागू केल्यानंतर फोनची किंमत 26,999 रुपयांपर्यंत खाली येईल.फ्लिपकार्ट फोनवर 17,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. पण, एक्सचेंज बोनसची रक्कम पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनची स्थितीवर अवलंबून असेल.

Google Pixel 6a चे फीचर्स 

Pixel 6a हा मोबाईल फुल एचडी रिझोल्यूशनसह 6.1 इंच OLED डिस्प्लेसह येतो. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर गुगल टेन्सर चिपसेट, टायटन M2 सिक्युरिटी कॉप्रोसेसर, 6GB LPDDR5 रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. 12.2 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल सेकंडरी लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Pixel 6a मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ v5.2 सपोर्ट, चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देखील आहे. Pixel 6a मध्ये जलद चार्जिंग सपोर्टसह 4410 mAh बॅटरी आहे.