आपल्या देशात लाखो लोक दररोज युपीआय (UPI) वापरतात आणि पेमेंट करतात. 2016 मध्ये एनपीसीआय (NPCI – National Payment Corporation of India) ने युपीआय लाँच केले होते. एनपीसीआयने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये युपीआयच्या मदतीने 10,72,792.68 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. काही लोकांना एकापेक्षा जास्त युपीआय आयडी वापरायचे असतात. आता यामागचे कारण कोणतेही असू शकते. अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही गुगल पे (Google Pay) वर एकापेक्षा जास्त युपीआय आयडी कसे तयार करू शकता.
गुगल पेवर किती युपीआय आयडी तयार केले जाऊ शकतात?
अनेकांच्या मनात पहिला प्रश्न असतो की एकापेक्षा जास्त युपीआय आयडी बनवणे शक्य आहे का? तर उत्तर होय आहे, तुम्ही एकापेक्षा जास्त युपीआय आयडी बनवू शकता. तुम्ही गुगल पे वर एका वेळी कमाल 4 युपीआय आयडी तयार करू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.
एकाधिक UPI आयडी तयार करण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम तुम्हाला तुमचे गुगल पे अॅप उघडावे लागेल.
- यानंतर, तुमच्या मोबाइल स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- प्रोफाइल आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पेमेंट मेथड नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता तुम्ही तुमचे गुगल पेशी लिंक असलेले बँक खाते पाहू शकता. येथे तुम्ही बँक खाते निवडा ज्यातून तुम्हाला नवीन युपीआय आयडी बनवायचा आहे.
- आता तुम्हाला मॅनेज युपीआय आयडी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला खाली युपीआय आयडी शो करेल जो @ ने सुरू होईल.
- तुम्हाला निवडायचा असलेल्या कोणत्याही युपीआय आयडीसमोर दिलेल्या प्लस चिन्हावर टॅप करा.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने तुमचे बँक खाते सत्यापित करण्यास सांगितले जाऊ शकते. ही पडताळणी पूर्ण करा.
युपीआय कसं काम करतं?
बॅंका ग्राहकाची ओळख त्याच्या सहीवरून करतात. युपीआयने (UPI) बॅंक ग्राहकांचा मोबाईल क्रमांक आणि मोबाईल फोन ही त्याची ओळख बनवली आहे. त्याला पीन आणि पासवर्डची जोड देऊन ते अधिक सुरक्षित बनवलं. ग्राहकाने त्याच्या बँक खात्याला त्याचा मोबाईल क्रमांक जोडलेला असणे हा UPI पेमेंट व्यवस्थेचा मुख्य भाग आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर आपला पीन पासवर्ड ने ही व्यवस्था वापरता येते. ज्याचा संपर्क क्रमांक हा त्याच्या बँक खात्याशी जोडला आहे अशा कोणत्याही बॅंक ग्राहकाला आपण फोन नंबरच्या मदतीने पैसे पाठवू शकतो. तसेच ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे ती व्यक्ती किंवा तो विक्रेत्यांचा त्यासाठीचा क्युआर कोड (QR code) स्कॅन करून पैसे पाठवता येतात.