Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Maps : गुगल मॅप्स तुम्हाला इंटरनेटशिवाय मार्ग दाखवेल, कसे? ते घ्या जाणून

Google Maps

निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी आपण अनेकदा गुगल मॅपचा आधार घेतो. पण इंटरनेट नसल्यास गुगल मॅप (Google Map) वापरु शकतो का? तर याचे उत्तर हो आहे. गुगल मॅप ऑफलाईन कसा वापरायचा? ते आज पाहूया.

जर तुम्ही नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला हे समजले पाहिजे की या अॅपमध्ये एक खास फीचर लपलेले आहे. इंटरनेटशिवायही तुम्ही गुगल मॅप्स (Google Maps) ऑफलाइन वापरू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुमचे उत्तर नाही असेल तर जाणून घ्या की तुम्‍ही इंटरनेटशिवाय नेव्हिगेशनसाठी गुगल मॅप्स (Google Maps) कसे वापरू शकता? आपण ज्या ठिकाणी जात असता, त्या मार्गाच्या मध्येच नेटवर्क नसल्यामुळे अनेकदा गुगल मॅप नीट काम करत नसल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत गुगल मॅप्सच्या फीचरबद्दल जाणून घेऊया. हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. जे तुम्हाला इंटरनेटशिवायही तुमच्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.

ही आहे प्रक्रिया

  • सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप्स Google Maps अॅप उघडावे लागेल.
  • तुमच्या फोनवर Google Maps अॅप उघडल्यानंतर, तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो वरच्या उजव्या बाजूला दिसेल, तुम्हाला तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करावे लागेल.
  • प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करताच तुमच्या समोर अनेक ऑप्शन ओपन होतील, येथे तुम्हाला ऑफलाइन मॅप्सचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • ऑफलाइन मॅप्स Offline Maps या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Select Your Own Map चा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या ऑप्शनवर क्लिक करताच एका बॉक्समध्ये तुम्हाला लोकेशन मॅप दिसेल, तुम्ही जिथे जाणार आहात ते ठिकाण बॉक्समध्ये आणा. हे काम करताच तुम्हाला खाली डाउनलोडचा पर्याय दिसेल, तुम्हाला फक्त घर सोडण्यापूर्वी लोकेशन मॅप डाउनलोड करायचा आहे. यानंतर, तुमच्याकडे इंटरनेट असो वा नसो, तुम्ही इंटरनेटशिवाय ऑफलाइन नकाशे वापरू शकाल.