भारतात आज,18 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 53,180 रुपये झाला आहे. एक किलो चांदीची किंमत 61,200 रुपये असून त्याच्या किंमतीत 800 रुपयांची घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, मुंबई आणि कोलकातामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,760 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,510 रुपये आणि नवी दिल्लीत 48,910 रुपये आहे. काल गुरुवारी सोन्याच्या किंमती किंचित घसरण झाली होती.आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमतींनी उसळी घेतल्याचे दिसून आले.
कोणत्या शहरात सोन्याचा काय भाव
24 कॅरेट सोन्याच्या दरावर नजर टाकल्यास कोलकाता आणि मुंबईत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,190 रुपये आहे. याच प्रमाणात 24 कॅरेट सोन्याची विक्री नवी दिल्लीत 53,360 रुपये आणि चेन्नईत 54,010 रुपयांनी केली जात आहे. जयपूर आणि मदुराईमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 48,910 रुपये आणि 49,510 रुपये आहे. जयपूरमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 53,360 रुपये आणि मदुराईमध्ये 54,010 रुपये आहे.
विजयवाडा, केरळ आणि विशाखापट्टणममध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,760 रुपये आहे. म्हैसूर बंगळुरू आणि सुरतमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं 48810 रुपयांना खरेदी केले जात आहे केरळ, विजयवाडा आणि विशाखापट्टणममध्ये 24 कॅरेटचे दहा ग्रॅम सोनं 53,190 रुपये आहे. म्हैसूर, बंगळुरू आणि सुरतमध्ये 24 कॅरेटचे दहा ग्रॅम सोनं ५३,२४० रुपयांना विकलं जात आहे. पुणे आणि अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची विक्री अनुक्रमे 48,790 रुपये आणि 48,810 रुपये झाली आहे. पुण्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 53 हजार 220 रुपयांना घेतले जात आहे, तर अहमदाबादमध्ये त्याची किंमत 53 हजार २४० रुपये आहे.