सोने आणि चांदीच्या किंमतीतील तेजी कायम आहे. आज शुक्रवारी 6 जानेवारी 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. आज शुक्रवारी सोने 110 रुपयांनी महागले. चांदीचा भाव 450 रुपयांनी वाढला. एमसीएक्समध्ये सोने तेजीत असले तरी सराफा बाजारांत मात्र सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. सोन्याच्या किंमतीत आज सराफा बाजारात किंचित घसरण झाली.
एमसीएक्सवर दुपारी दोन वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55400 रुपये इतका वाढला आहे. त्यात 110 रुपयांची वाढ झाली. आजच्या सत्रात इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 55430 रुपये इतका वाढला होता. सोन्याबरोबरच चांदीमध्ये आज तेजी दिसून आली. आज एक किलो चांदीचा भाव 68530 रुपये इतका वाढला आहे. त्यात 452 रुपयांची वाढ झाली.
सकाळी कमॉडिटी बाजार खुला होताच सोन्याचा भाव 55383 रुपयांवर खुला झाला. त्यात 93 रुपयांची वाढ झाली होती. पुढे ही तेजी आणखी विस्तारली. एमसीएक्सवर चांदीचा भाव 68415 रुपयांच्या पातळीवर खुला झाला होता. नजिकच्या काळात सोन्याचा भाव 54850 ते 55030 या दरम्यान राहण्याचा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
जागतिक बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 1% कमी झाला होता. आज स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 1838.38 डॉलर इतका आहे. त्यात 0.8% वाढ झाली. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 1843.80 डॉलर इतका आहे.
Goodreturns.com या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेटचा भाव 50900 रुपये इतका आहे. त्यात 400 रुपयांची घसरण झाली. मुंबईत 24 कॅरेटचा भाव 55530 रुपये इतका आहे. दिल्लीमध्ये 22 कॅरेटचा भाव 51050 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 56680 रुपये इतका आहे. त्यात 430 रुपयांची घसरण झाली. कोलकात्यामध्ये 22 कॅरेटचा भाव 50900 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 55530 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेटचा भाव 51900 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 56620 रुपये इतका आहे.