जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि मागणी कमी झाल्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली. आज गुरुवारी 16 फेब्रुवारी 2023 रोजी सराफा बाजारात सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले तर कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 110 रुपयांनी घसरला. सलग दोन सत्रात सोन्याचा भाव 800 रुपयांनी कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस 1850 डॉलर खाली आला आहे. मागील महिनाभरातील हा नीचांकी स्तर आहे. (Gold and Silver Price Fall today)
आज गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 56011 रुपये इतका आहे. त्यात 110 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 65371 रुपये इतका खाली आला असून त्यात 60 रुपयांची घसरण झाली. बुधवारच्या सत्रात सोन्याचा भाव 700 रुपयांनी स्वस्त झाला होता. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56126 रुपयांवर बंद झाला होता. चांदीमध्ये 200 रुपयांची घसरण झाली होती.
Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज गुरुवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52000 रुपये इतका आहे. त्यात 400 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटचा भाव 56730 रुपये इतका आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत 430 रुपयांची घसरण झाली. पुण्यात आजचा 22 कॅरेटचा भाव 52000 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56730 रुपये इतका आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52150 रुपये इतका आहे. त्यात 400 रुपयांची घसरण झाली. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 56880 रुपये इतका खाली आला आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत 430 रुपयांची घसरण झाली. चेन्नईत देखील आज सोन्याचा भाव 350 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52800 रुपये इतका आहे. त्यात 350 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 57600 रुपये इतका असून त्यात बुधवारच्या तुलनेत 380 रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52000 रुपये आहे. त्यात 400 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटचा भाव 56950 रुपये इतका असून सोनं 210 रुपयांनी स्वस्त झाले.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज गुरुवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56343 रुपये इतका आहे. 23 कॅरेटचा दर 56117 रुपये असून 18 कॅरेट सोन्याचा भाव 51610 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 56474 रुपये इतका आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव 0.3% ने वाढला असून तो 1840.94 डॉलर प्रती औंस इतका झाला. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 0.3% ने वाढून 1850.20 डॉलर प्रती औंस इतका झाला. चांदीचा भाव 1.42% ने घसरला असून तो 21.53 डॉलर प्रती औंस इतका आला. यापूर्वी बुधवारच्या सत्रात सोन्याचा भाव 1830 डॉलरपर्यंत खाली आला होता. मागील महिनाभरातील ही त्याची नीचांकी पातळी होती. आज मात्र सोन्याचा भाव काही प्रमाणात सावरला.
सोन्याचा भाव आणखी कमी होणार कारण...
- आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किंमतींवर दबाव आहे.
- अमेरिकेतील मंदीची प्रभाव कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात किरकोळी विक्रीने नवा उच्चांक गाठला.
- मागील दोन वर्षातील सर्वाधिक विक्री ठरली.
- महागाईच्या ताज्या आकडेवारीचा विचार करता फेडरल रिझर्व्हचा व्याजदर वाढीचे संकट कमी झालेले नाही.
- अमेरिकेतील कारखाना उत्पादनात अपेक्षेप्रमाणे चांगली वाढ झाली.
- डॉलर इंडेक्स वाढला त्यामुळे सोन्यावर दबाव असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे मत, डॉलर इंडेक्स 103.50 वर आहे.
- यूएस 10 वर्ष मुदतीचे बॉंड यिल्ड 3.80% वर
- कमॉडिटी बाजारात सोन्याची किंमत 9 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर, चांदीचा भाव 2.5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
- नजिकच्या काळात सोन्याचा भाव 1800 डॉलरखाली येण्याचा अंदाज