Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Silver Price Today: जगभरात सोन्याचे भाव उतरले, भारतात मात्र भाववाढ सुरुच!

Gold silver

सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये आजही वाढ (Gold and Silver Price Hike) नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती कमी होत असताना भरतात मात्र सोन्याची भाववाढ कायम आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोन्याचे भाव आजही महागले आहेत. जगभरात सोन्याच्या किंमती स्वस्त होत असताना भारतात मात्र सोन्याची भाववाढ कायम राहण्याची चिन्हे आहेत. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर सुमारे 22 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. भारतात मात्र सोन्याचे भाव 8-10 टक्क्यांनी वधारले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा पुरवठा पहिल्यापेक्षा सुधारला आहे. तसेच सोन्याच्या खाणींमधून सोन्याची आवक देखील वाढली आहे. पुरवठा जास्त प्रमाणात होत असताना मागणी मात्र कमी असल्याचे दिसते आहे. जागतिक आर्थिक मंदीचे सावट हे त्याचे एक कारण असल्याचे मानले जात आहे. युरोप आणि अमेरिकेत अनेक कंपन्यांनी कामगार कपात सुरू ठेवली असल्याकारणाने सोने खरेदीची मागणी घटली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव 22 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.

भारतात सोन्याची भाववाढ का? (Why the rise in gold prices in India?)

जागतिक मंदीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळतो आहे. मंदीच्या भीतीने सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे देखील सोने खरेदी सुरू ठेवली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीनने सोने पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे आशिया खंडात सोन्याची आवक कमी झाली आहे. 2023 च्या वर्षाअखेरीस सोन्याचे भाव 62 ते 64 हजारांपर्यंत जाऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे.

todays-gold-and-silver-rates.jpg

सोन्याला झळाळी! चांदी देखील महाग! (Gold and Silver is more expensive!)

मुंबईत 24 कॅरेटचे सोने ₹57,930 वर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹53,100 इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात अत्यल्प चढउतार पाहायला मिळत आहेत. चांदीच्या भावात  देखील विशेष बदल झालेला नाहीये. चांदीचा दर प्रति किलो ₹72,600 इतका नोंदवला गेला आहे. भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. भारतीय परंपरेत लग्नकार्यात सोन्याला विशेष महत्व असते. सोन्या-चांदीला वाढती मागणी पाहता पुढचे काही दिवस सोन्याचे भाव वाढत जाण्याची शक्यता आहे. भारतात सोन्याच्या खाणी नाहीत. भारतात सोने आयात केले जाते, त्यामुळे भारतीयांना सोन्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घडणाऱ्या घडामोडींचा सरळ प्रभाव सोन्या-चांदीच्या किमतीवर बघायला मिळतो.