जागतिक कमॉडिटी बाजारातील सोन्याच्या किंमतीतमधील तेजी कायम आहे. आज मंगळवारी 10 जानेवारी 2023 सोन्याच्या किंमतीत 33 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमचा भाव 55910 रुपये इतका वाढला. चांदीचा भाव 68590 रुपये इतका असून त्यात मात्र 310 रुपयांची घसरण झाली.
जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1872.79 डॉलर प्रती औंस आहे. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 1877.70 डॉलर प्रती औंस इतका आहे. डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्यानंतर सोमवारी सोन्याचा भाव वधारला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सात महिन्यांच्या उच्चांकावर गेला होता. सोमवारी डॉलर इंडेक्स 103 खाली गेला होता. चीनमधील सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळाल्याचे जाणकारांनी सांगितले. आगामी सत्रात सोन्याचा भाव 1858 डॉलर ते 1845 डॉलरच्या दरम्यान राहील, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत नफावसुलीचा फटका बसला. मुंबईतील सराफा बाजारात सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. Goodreturns वेबसाईटनुसार आज मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 51450 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 56130 रुपये इतका आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 51600 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 56290 रुपये इतका आहे. त्यात 150 रुपयांची घसरण झाली.
चेन्नईत आज सोने 230 रुपयांनी स्वस्त झाले. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52370 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 57130 रुपये इतका आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51450 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 56130 रुपये इतका आहे.