जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांनी कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने दरात आज 160 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 55899 रुपये इतका वाढला. आज चांदी 600 रुपयांनी महागली आहे.
एमसीएक्सवर संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55870 रुपये इतका आहे. त्यात 131 रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 55899 रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव 64551 रुपये इतका आहे. त्यात 517 रुपयांची वाढ झाली आहे. इंट्राडेमध्ये चांदीचा भाव 64645 रुपयांपर्यंत वाढला होता.
देशभरातील प्रमुख सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार आज दिल्लीतील सराफा बाजारात सोनं 160 रुपयांनी महागले. सोन्याचा भाव 55940 रुपये इतका वाढला. काल गुरुवारच्या सत्रात सोने 55780 र रुपयांवर स्थिरावले होते. आज चांदी 220 रुपयांनी महागली असून एक किलो चांदीचा भाव 64700 रुपये इतका आहे.
Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज शुक्रवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51750 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 56450 रुपये इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरेटचा भाव 51750 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56450 रुपये इतका आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 51900 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 56600 रुपये इतका आहे. चेन्नईत आज सोने 40 रुपयांनी स्वस्त झाले. 22 कॅरेट सोन्याचा भाव 52400 रुपये इतका आहे.24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 57160 रुपये इतका आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51750 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 56450 रुपये इतका आहे.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज शुक्रवारी 3 मार्च 2023 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56091 रुपये इतका आहे. 22 कॅरेटचा दर 56866 रुपये असून 18 कॅरेट सोन्याचा भाव 42068 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 64043 रुपये इतका आहे.
वर्ल्ड मार्केटमध्ये सोने-चांदी तेजीत
जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदी तेजीत आहेत. सोन्याच्या किंमतीत 0.2% वाढ झाली आहे. सोन्याचा सध्याचा दर 1838.84 डॉलर प्रती औंस इतका आहे. यूएस गोल्डचा भाव 0.2% ने वाढला असून तो 1844.20 डॉलर इतका आहे. मागील आठवडाभरात सोन्याचा भाव 1.5% ने वाढला आहे. दुसऱ्या बाजूला डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींना फायदा झाला. डॉलर इंडेक्स 0.1% ने घसरला आहे. चांदीचा भाव 20.98 डॉलर प्रती औंस आहे. त्यात 0.4% वाढ झाली.
महागाईने फेडरल रिझर्व्हची चिंता वाढवली
अमेरिकेतील महागाई वाढत आहे. त्यामुळे तेथील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे सत्र कायम ठेवण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हकडून आगामी पतधोरणात व्याजदरात 0.25% वाढ केली जाण्याची शक्यता आहे. याच शक्यतेने मागील काही सत्रात सोन्याचा भाव वाढला असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी म्हटले आहे. यूएस ट्रेझरी यिल्ड 5% वर गेली आहे. मागील 16 वर्षांतील हा उच्चांकी स्तर आहे. नजीकच्या काळात सोन्याचा भाव 1750 डॉलर ते 1800 डॉलर या दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.