तुम्ही 31 मार्चनंतर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. हॉलमार्क नसलेले दागिने 31 मार्च 2023 नंतर वैध असणार नाहीत. केंद्र सरकारने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 31 मार्चनंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय कोणतेही दागिने विकू शकणार नाहीत (change in gold purchase rules), अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.
चार अंकी हॉलमार्कही पूर्णपणे बंद होणार
4 आणि 6 अंकी हॉलमार्किंगच्या गोंधळाबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक मंत्रालयाने सांगितले. नवीन नियमानुसार, आता फक्त 6 अंकांचे अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकणे वैध ठरणार नाही. यासोबतच मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, आता चार अंकी हॉलमार्कही पूर्णपणे बंद केले जातील. देशात बनावट दागिन्यांची विक्री रोखण्यासाठी सरकारने दीड वर्षापूर्वीच प्रयत्न सुरू केले होते, हे विशेष.
एचयूआयडी म्हणजे काय?
एचयूआयडी म्हणजेच, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक दागिन्यांची शुद्धता ओळखतो. हा 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्याद्वारे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची सर्व माहिती मिळते. या कोडच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच घट झाली आहे. हा नंबर प्रत्येक दागिन्यावर लावला जातो. अशा परिस्थितीत 1 एप्रिलपासून दुकानदारांना हॉलमार्कशिवाय दागिने विकता येणार नाहीत, तर ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने दागिने विकता येणार आहेत. देशभरात एकूण 1338 हॉलमार्किंग केंद्रे की हे केंद्रं देशातील 85 टक्के भागात आहे आणि उर्वरित भागांमध्ये आणखी केंद्रं उभारली जात आहेत.
अनेक उत्पादनांमध्येही गुणवत्ता निश्चित केली जाईल
याबाबत CNBC TV18 शी बोलताना, ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की, दागिन्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यांच्या मते, भारत आणखी अनेक उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलत आहे आणि 663 उत्पादनांसाठी सल्ला मागवण्यात आला आहे. याशिवाय, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि टिकाऊ वस्तू विभागांशी संबंधित उत्पादनांसाठी गुणवत्ता मानके निश्चित करण्याचे काम सुरू आहे. खरे तर सरकार निर्यात वाढवण्यावर भर देत असून गुणवत्तेवर भर देऊन भारतीय कंपन्यांना नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच ग्राहकांनाही याचा फायदा होतो.
Source: https://bit.ly/3kPdwtR