सोनं आणि चांदी या दोन्हींच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी उसळी पाहायला मिळाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किंमतीनुसार, 999 कॅरेट सोनं आज जवळपास 52952 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. तर 995 कॅरेट सोने 52740 रुपयांवर, 916 कॅरेट सोने 48504 रुपयांवर, 750 कॅरेट सोने 39714 रुपयांवर उघडले, 585 कॅरेट सोने 30977 वर उघडले, तर 999 कॅरेट चांदी 61784 रुपयांवर ट्रेड करत आहे.
एमसीएक्सवर सोने-चांदीचा आजचा भाव (Gold and Silver Rate on MCX)
वायदे बाजारातील सोने-चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोन्याचा डिसेंबर वायदा 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीचा डिसेंबरचा वायदा आज 62000 रुपये प्रति किलोच्या आसपास ट्रेड करत आहे. मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 52360 असून 22 कॅरेटसाठी 48000 रुपये इतका होता. नागपूरमध्ये 24 कॅरेटचा भाव 52390 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 48030 रुपये इतका होता.
सोन्यासाठी आता वन नेशन वन रेट (One Nation One Rate)
मलबार गोल्ड अँड डायमंड्स, जोआलुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या केरळच्या आघाडीच्या ज्वेलर्सनी आपल्या ग्राहकांना बँक दराच्या आधारे समान सोन्याचा दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित राज्यांमध्ये गोल्ड असोसिएशनने ठरविलेल्या दरानुसार सोन्याचा दर वेगवेगळा असतो. मात्र, ज्वेलर्स अनेकदा एकाच राज्यात सोन्याचे वेगवेगळे दर आकारतात. जोआलुक्कास ग्रुपचे चेअरमन जॉय अलुकास यांनी सांगितले की, "आम्ही देशातील आमच्या सर्व शोरुममध्ये सोन्याचा समान भाव देत आहोत.”
राज्यातील सोन्याचा दर ठरवणाऱ्या ऑल केरळ गोल्ड अँड सिल्व्हर मर्चंट्स असोसिएशनशी नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान समान सोन्याचा दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, सोन्याचा एकसमान दर लागू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
ग्राहकांना वाजवी आणि पारदर्शक किंमतीत सोने खरेदीची संधी (Gold Price Will More Transparent)
आम्ही तुम्हाला सांगतो की, मंगळवारी 22 कॅरेट सोने 48,435 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले. देशातील सोन्याचा सर्वाधिक वापर करणारे केरळ हे राज्य असल्याने देशभरात सोन्याच्या एकसमान किंमतीची स्थिती निर्माण होऊ शकते, असे मलबार समूहाचे अध्यक्ष एमपी अहमद यांनी सांगितले. बँक रेटच्या आधारे सोन्याचा दर देशभरात एकसारखा असायला हवा मात्र, बहुतांश राज्यांमध्ये विशिष्ट दिवशी वेगवेगळ्या किंमतीला सोन्याचा भाव 150-300 रुपये प्रति ग्रॅमपेक्षा जास्त असतो. बँक रेटवर आधारित सोन्याच्या एकसमान किंमतीमुळे ग्राहकांना वाजवी आणि पारदर्शक किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी मिळते.