Gold and Silver Rates 13th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसते आहे. सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्या-चांदीला मोठी मागणी आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ नोंदवली गेली आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भाववाढ होतच राहील असं जाणकारांचं मत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ होत असताना ही भाववाढ होणे अपेक्षितच आहे असे सोने-चांदी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या माहितीनुसार (Multi commodity Exchange) 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर इतका नोंदवला गेलाय.काल सोन्याचा भाव 60613 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. कालच्या म्हणजेच 12 एप्रिल 2023 च्या तुलनेत 0.16% रुपयांनी वाढ झालेली दिसते आहे. अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचे भाव हे वाढतच राहतील असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केलाय. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून यादिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणाच्या निमित्ताने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते.
चांदीच्या किंमतीतही वाढ
सोन्यासोबत चांदीच्या किंमतीत देखील भाववाढ पाहायला मिळते आहे.सकाळी चांदी बाजार 76,034 रुपयांत उघडला आणि दुपारी 12 वाजेपर्यंत 75,939 प्रति किलो चांदीची विक्री होत आहे. कालच्या चांदीच्या किंमतीचा विचार करता आज 0.03 टक्क्यांनी चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची वाढती मागणी असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत देखील सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. कालच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 0.12% तर चांदीच्या किंमतीत 0.37% वाढ पाहायला मिळाली आहे.
देशातील काही शहरांमधले सोन्याचे दर
- 22 कॅरेट सोन्याची किंमत दिल्लीत 56,250 रुपये प्रति तोळा नोंदवली गेली आहे.
- मुंबईत 22 कॅरेट सोने प्रति तोळा 56,100 रुपये दराने विकले जात आहे.
- कोलकातामध्ये 24 कॅरेट सोने 56,100 रुपये प्रति तोळा दराने ग्राहक खरेदी करतायेत.
- चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 56,760 रुपये प्रति तोळा किंमतीत विकले जात आहे.
देशातील काही शहरांमधले चांदीचे भाव
दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये चांदी 78,000 रुपये किलो दराने विकली जात आहे.कोलकातामध्ये मात्र एक किलो चांदीसाठी 81,800 रुपये मोजावे लागत आहेत.