Gold-Silver Price 6 February 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत चालल्या होत्या. आज मात्र सोन्या-चांदीच्या किमतीत स्थिरता पाहायला मिळते आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्या-चांदीच्या आयातीवरील कर वाढवल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात विशेष अशी वाढ नोंदवली गेलेली नाही.
आजचा सोने चांदीचा दर काय?
आज भारतीय सराफा बाजारात(MCX) सोन्याच्या भावात विशेष बदल झालेला नाही, आज सोन्याचे भाव 24 कॅरेटसाठी 57,160 रुपये इतके आहेत. रविवारी प्रति 10 ग्रॅम साठी हाच दर नोंदवण्यात आला होता. कालच्या तुलनेत आज प्रति तोळ्यामागे घसरण पाहायला मिळालेली नाही. त्याचवेळी चांदी देखील 71,200 रुपयांवर विकली जात आहे, काल देखील याच भावाने चांदीची विक्री केली गेली होती. आज सराफा बाजारात जीएसटीसह (GST) 24 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 57,160 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
सोन्याची शुद्धता तपासूनच खरेदी करा
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ हे अॅप बनविण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहक स्वतः सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतात. सोने खरेदी करताना ग्राहकांनी त्याची शुद्धता तपासलीच पाहिजे.
अशी तपासावी सोन्याची शुद्धता
- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते
- 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते
- 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते
- 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते
- 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते
जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहेत. जागतिक मंदीचे सावट असल्याकारणाने सोन्याची जागतिक बाजारपेठेत मागणी मंदावली आहे.
सोन्या-चांदीचे भाव स्थिर असतानाचा चिकन आणि मटणाचे दर मात्र वाढले आहेत. चिकन आज 160 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. काल चिकन 150 रुपये किलो दराने विकले जात होते. मटणाच्या दरात देखील आज भाववाढ पाहायला मिळाली. आज मटण 760 रुपये किलो दराने विकले जात आहे, काल याची विक्री 750 रुपये किलो दराने केली गेली होती.