Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Rate Today In Mumbai: सोने-चांदीमधील तेजी कायम, सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले

Gold rate today in Mumbai

जागतिक कमॉडिटी बाजारातील तेजीने स्थानिक सराफा बाजारात सोने झळाळून निघाले आहे. मंगळवारी सोन्याचा भाव दोन वर्षांच्या उच्चांकावर गेला होता. आज बुधवारी 4 जानेवारी 2023 रोजी सोने 170 रुपयांनी महागले.

सोने आणि चांदीमधील तेजी कायम आहे. आज बुधवारी 4 जानेवारी 2023 रोजी मुंबई सराफा बाजारात सोने 170 रुपयांनी महागले. सोने दर प्रति 10 ग्रॅमचा भाव 55580 रुपये  इतका वाढला. कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किंमतीत आज 224 रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर सकाळी 10.30 वाजता सोन्याचा भाव 55754 रुपये इतका वाढला आहे. (Gold and Silver Price Rise on Second Cosecutive day in Mumbai)

सोने-चांदीच्या किंमतींमध्ये मागील आठवडाभरापासून तेजी आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. तेथे दररोज लाखो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याच्या वृत्त आहे. त्यामुळे जगभरात कोरोना संकट पुन्हा गडद बनले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट नियंत्रणात आला नाही तर जग पुन्हा लॉकडाउनच्या दृष्टचक्रात अडकेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे बड्या गुंतवणूकादारांनी उदयोन्मुख बाजारांतून गुंतवणूक काढून ती सोने-चांदीकडे वळवली आहे. संकटकाळात किंवा अनिश्चित काळात सुरक्षित आणि भरवशाची गुंतवणूक म्हणून सोने ओळखले जाते.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज बुधवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 55746 रुपये इतका वाढला आहे. त्यात 216 रुपयांची वाढ झाली. इंट्रा डे मध्ये सोने दर 55772 रुपये इतका वाढला. कालच्या सत्रात सोने 55530 रुपयांवर स्थिरावले होते.  कालच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55800 रुपयांपर्यंत वाढला होता. त्यात सोमवारच्या तुलनेत 341 रुपयांची वाढ झाली होती.

आज बुधवारी चांदीचा भाव एक किलोला 70182 रुपयांवर गेला. त्यात 265 रुपयांची वाढ झाली.  चांदीच्या किंमतीत मंगळवारी 1040 रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारी एमसीएक्सवर चांदीचा भाव एक किलोला 70610 रुपयांवर गेला होता.

जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1843 डॉलर प्रति औंस इतका आहे. चांदीचा भाव प्रति औंस 24.37 डॉलर इतका आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे इतिवृत्त लवकरच जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात तेजी असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमॉडिटी रिसर्च प्रमुख नवनीत दमानी यांनी सांगितले.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 51100 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 55750 रुपये इतका आहे. मुंबईत एक किलो चांदीचा भाव 72000 रुपये इतका आहे.

दिल्लीमध्ये आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 51250 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 55900 रुपये इतका आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत 170 रुपयांची वाढ झाली. चेन्नईत 22 कॅरेटचा भाव 52080 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 56800 रुपये इतका आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51100 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 55750 रुपये इतका आहे.