Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Damage Due to wildfires: जंगलातील वणव्यामुळे किती नुकसान होतं? तंत्रज्ञानामुळे आग रोखण्यास होऊ शकते मदत

wildfires mitigation through AI

Image Source : www.thenews.com.pk

2021 वर्षात जंगलांना लागलेल्या आगीमुळे पर्यावरणात 6 हजार 450 मेगा टन इतका कार्बनडायऑक्साइड पसरला. ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यांमुळे 3 बिलियन पेक्षा जास्त प्राण्यांचा मृत्यू किंवा विस्थापन झाले. 2050 पर्यंत जगामध्ये वणव्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढू शकते, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात म्हटले आहे.

दरवर्षी जगातील अनेक देशांमध्ये जंगलांना आगी लागतात. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतील जंगलांना लागलेल्या आगी तर कित्येक महिने सुरू असतात. या आगींमध्ये वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो, नैसर्गिक संपत्ती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसानीचा आकडा दरवर्षी 50 बिलियन डॉलरपर्यंत असतो, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे. मालमत्तेच्या नुकसानीसोबतच पर्यावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्साइड सोडला जातो. या आगी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.

2021 वर्षात जंगलांना लागलेल्या आगीमुळे पर्यावरणात 6 हजार 450 मेगा टन इतका कार्बनडायऑक्साइड पसरला. ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे 3 बिलियन पेक्षा जास्त प्राण्यांचा मृत्यू किंवा विस्थापन झाले. 2050 पर्यंत जगामध्ये वणव्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढू शकते, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात म्हटले आहे. वणव्यामुळे उष्णतेच्या लाटाही वाढतात. जगातील 30 टक्के लोकसंख्या या उष्णतेच्या लाटांमुळे प्रभावित होते, असे WEF ने म्हटले आहे.

आग रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग

भूमध्य समुद्र आणि टर्की देशातील वणवे रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला. या पायलट प्रकल्पातून संभाव्य आगी लागण्याचे ठिकाण ओळखण्यात यश आले. तसेच आग विझवत असताना अग्निशामक दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठी अधिक चागंल्या उपाययोजना करता आल्या. वाइल्डफायर रिस्क मॅपिंगमुळे कोणत्या भागात आग लागू शकते याचा अचूक अंदाज तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधता येत आहे. 

भविष्यामध्ये जंगलांना लागणाऱ्या आगी कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग यांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आग्रही आहे. सांख्यिकी आणि हवामान खात्यातील माहितीचा वापर करून आग लागल्यानंतर लवकरात लवकर आग रोखता येते. जंगलातील आगीची रिअल टाइम माहिती मिळावी म्हणून नासाने आणि गुगलनेही उपग्रह अवकाशात सोडले आहेत. फक्त 1 मिनिटाच्या फरकाने आगीची ताजी माहिती मिळते. या लाइव्ह डेटामुळे जंगलात आग नक्की कोणत्या भागात पसरलेली आहे, हे समजून विझवण्यास मदत होते.