Tax Exemption On Majhi Kanya Bhagyashree Yojana : माझी कन्या भाग्यश्री योजने (Majhi Kanya Bhagyashree Yojana) अंतर्गत महाराष्ट्र सरकार कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर 50,000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही योजना महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2016 रोजी सुरू केली होती. राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रात राहणारे अनेक नागरिक घेत आहेत. दारिद्र्य रेषेवरील कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री ही नवीन सुधारीत योजना सुरु करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
कश्या प्रकारे मिळतात सुविधा
दोन मुलींच्या जन्मानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येक मुलीच्या नावे बॅंकेत प्रत्येकी 25,000 रुपयांची मुदत ठेव केली जाते. पहिल्या 6 वर्षात जमा होणारे व्याज मुलींच्या सहाव्या वर्षी पालकांना काढता येऊ शकते. तर पुढील सहाव्या वर्षी म्हणजे मुली 12 वर्षांच्या झाल्या की पुन्हा पालक मुदत ठेवींच्या रकमेवर जमा होणारे व्याज काढू शकतात आणि त्या मुलींच्या 18 वर्षानंतर जमा केलेली 25 हजार रुपयांची मुदत ठेव आणि त्यावर जमा होणाऱ्या व्याजाची रक्कम काढू शकतात.
योजनेचे महत्व
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार वाढवणे तसेच मुलांसोबत मुलींचाही जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशाप्रकारे एकूण मुलींचा सर्वांगिण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली. महाराष्ट्र सरकारने पूर्वीची सुकन्या योजना विलीन करून त्याऐवजी ही योजना सुरू केली. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले कोणतेही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज देण्यात आला आहे. अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्ता, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आईच्या किंवा मुलीच्या बँक खात्याच्या पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका / महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर अंगणवाडी सेविकेकडे या योजनेचा अर्ज सादर करावा. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या सरकारी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यावर योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि फॉर्ममध्ये विचारलेल्या माहितीनुसार संपूर्ण माहिती योग्य पध्दतीने भरुन तो फॉर्म सादर करावा लागेल.
ही योजना करमुक्त आहे का?
माझी कन्या भाग्यश्री योजनेतील गुंतवणूक आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत सूट मिळण्यास पात्र आहे की नाही? तसेच या योजनेतील व्याज उत्पन्न करमुक्त आहे की नाही? याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही.