Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Bima Ratna Plan : एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये, मुदतपूर्तीपूर्वीच मिळवा परतावा

LIC

LIC विमा रत्न योजना पॉलिसीधारकासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकते. अधिक कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.ही पॉलिसी ग्राहकांना प्रीमियम आणि मुदतीच्या आधारावर वेगवेगळे फायदे देते. गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचा लाभ या योजनेतून मिळू शकतो.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC (Life Insurance Corporation of India) गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या पॉलिसी लॉन्च करत असते. या पॉलिसी त्यांच्या प्रीमियम आणि मुदतीच्या आधारावर पॉलिसीधारकांना वेगवेगळे फायदे देतात. यामध्ये अनेक योजना गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचा लाभ देतात. तुम्हीही LIC मध्ये गुंतवणुकीसाठी अशीच योजना शोधत असाल, तर LIC Bima Ratna योजना तुमच्यासाठी खास ठरु शकते. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

LIC विमा रत्न पॉलिसी काय आहे? (What is Bima Ratna Policy)

LIC विमा रत्न ही एक नॉन-लिंक्ड, गैर-सहभागी, वैयक्तिक, बचत, जीवन विमा योजना आहे, जी गुंतवणूकदारांना बचत तसेच संरक्षणाचा पर्याय प्रदान करते. यासह, पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास आणि मुदत कालावधीनंतर काहीही न झाल्यास डेथ बेनिफिट दिला जातो. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये गुंतवणूकदाराला मनीबॅक आणि गॅरंटीड बोनस सारखे फायदे दिले जातात. या योजनेची ही खास वैशिष्ट्य आहे.

LIC विमा रत्न मध्ये किती फायदा मिळेल (Benifits of LIC Bima Ratna Scheme)

LIC विमा रत्न मध्ये, तुम्हाला कालावधीनुसार फायदे मिळतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 15 वर्षांच्या मुदतीसाठी पॉलिसी निवडली असेल, तर 25 टक्के रक्कम तुम्हाला 13व्या आणि 14व्या वर्षी परत केली जाते. अशा प्रकारे, ही रक्कम तुम्हाला 18व्या आणि 19व्या वर्षी 20 वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी आणि 23व्या आणि 24व्या वर्षी 25 वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी परत केली जाते.

हमखास बोनस (Garntee Bonus) 
या योजनेत, हमखास बोनस म्हणून, पहिल्या 5 वर्षात 50 रुपये प्रति हजार बोनस आणि 6 ते 10 वर्षांमध्ये 55 रुपये प्रति हजार बोनस आणि 10 वर्षानंतर, तुम्हाला प्रति हजार रुपये 60 रुपये बोनस दिला जातो.

मृत्यू लाभ (Death Benifit) 
पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला बेसिक सम अश्युअर्डच्या 125 टक्के किंवा वार्षिक प्रीमियमच्या सात पट, यापैकी जे जास्त असेल तितकी रक्कम दिली जाते. मृत्यू लाभ कोणत्याही परिस्थितीत पॉलिसीच्या कालावधी दरम्यान भरलेल्या प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी नसेल.

LIC विमा रत्न ची प्रमुख वैशिष्ट्ये (Features of LIC Bima Ratna Scheme)

LIC विमा रत्न 90 दिवस ते 55 वर्षे वयापर्यंत पॉलिसीधारक गुंतवू शकतो.
यामध्ये किमान 15 वर्षांसाठी किमान 5 लाखांची विमा रक्कम पॉलिसीधारकाला घ्यावी लागेल. 15 वर्षांसाठी 5 लाखांची विमा रक्कम घेतल्यास, तुम्ही सुमारे 9,00,000 रुपये मिळवू शकता.
यामध्ये किमान 5000 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.

अशाप्रकारे LIC विमा रत्न योजना पॉलिसीधारकासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकते. अधिक कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.