Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Use of Credit Cards : विमान प्रवास करताना ‘या’ क्रेडिट कार्ड्सचा वापर करून मिळवा चांगली सूट

Use of Credit Cards

तुम्ही वारंवार प्रवास करत असाल तर तुम्हाला हे देखील माहीत असेल की गर्दीच्या विमानतळांवर थांबणे खूप कंटाळवाणे असते. योग्य क्रेडिट कार्ड निवडून, तुम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश (Free access to domestic and international airport lounges) मिळवू शकता.

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) घेता तेव्हा तुम्ही ते चाणाक्षपणे वापरत आहात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड व्याजमुक्त कालावधी देतात ज्यामुळे तुम्ही प्रवास करताना अधिक खर्च करू शकता. अशा परिस्थितीत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जर तुम्ही परतफेड करण्यापेक्षा जास्त खर्च केला आणि तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरले नाही तर तुम्हाला मोठ्या व्याजदराचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल तर तुम्हाला हे देखील माहीत असेल की गर्दीच्या विमानतळांवर थांबणे खूप कंटाळवाणे असते. योग्य क्रेडिट कार्ड निवडून, तुम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश (Free access to domestic and international airport lounges) मिळवू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमचा प्रवास खूप सोपा करू शकता. या प्रकारच्या क्रेडिट कार्डांचा वापर करून, तुम्ही प्रायमरी चेक-इन, एक्स्ट्रा रिवॉर्ड पॉइंट्स, को-ब्रँडेड बेनेफिट्स आणि अगदी मोफत फ्लाइट तिकीट यासारखे अतिरिक्त फायदे मिळवू शकता.

एचडीएफसी बँक

HDFC Regalia क्रेडिट कार्ड हे कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज एक्सेस देतं. याच्या वापरामुळे प्रत्येक कॅलेंडर वर्षात भारतात 12 आणि परदेशात 6 लाउंजमध्ये प्रवेश मिळतो. हे रिटेल एक्सपेंसवर प्रति 150   रुपयांवर 4 रिवॉर्ड पॉइंट ऑफर करतं. या कार्डची वार्षिक फी 2,500 रुपये आहे. वार्षिक 3 लाख रुपये खर्च केल्यानंतर नूतनीकरण शुल्क माफ केले जाते.

एसबीआय कार्ड

इतिहाद गेस्ट एसबीआय प्रीमियर क्रेडिट कार्ड कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज एक्सेस देतं. हे भारतातील 8 लाउंज आणि परदेशात 4 लाउंजमध्ये एक्सेस देतं. हे वेलकम गिफ्ट म्हणून 5,000 इतिहाद गेस्ट माइल्स आणि पहिल्या कार्ड ट्रान्झॅक्शन नंतर कॉम्प्लिमेंटरी एतिहाद गेस्ट गोल्ड टियर स्टेटस देखील देते. एका कॅलेंडर तिमाहीत 1.5 लाख रुपये खर्च केल्यावर, ग्राहकाला 1,500 इतिहाद गेस्ट माईल मिळतात. या कार्डची वार्षिक फी 4,999 रुपये आहे.

कोटक महिंद्रा बँक

कोटक इंडिगो का-चिंग 6 ई एक्सएल क्रेडिट कार्ड भारतात 8  कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज एक्सेस देतं. हे 3,000 रुपये किमतीचे वेलकम तिकीट, 5,000 रुपये किमतीचे अँक्कोर हॉटेल डायनिंग व्हाउचर, 899 रुपये किमतीचे अॅड-ऑन देखील देतं. यामध्ये प्रायमरी चेक-इन, कॉम्प्लिमेंटरी फूड आणि सामान सहाय्य समाविष्ट आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड स्वाइप करता, तुम्हाला इंडिगो तिकिटांच्या पूर्ततेसाठी 6E रिवॉर्ड्स मिळतात. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.

एसबीआय कार्ड

एसबीआय् कार्ड, कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज एक्सेस देतं. हे एका वर्षात भारतात 8 आणि परदेशात 4 लाउंज एक्सेस देतं. हे 3,000 रुपये किमतीचे वेलकम ई-गिफ्ट व्हाउचर आणि जेवण, किराणा सामान, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि चित्रपटांवर खर्च केलेल्या प्रति 100 रुपये 10 रिवॉर्ड पॉइंट ऑफर करतं. कार्डधारकाला कॉम्प्लिमेंटरी ट्रायडेंट प्रिव्हिलेज रेड मेंबरशिप आणि क्लब विस्तारा सिल्व्हर मेंबरशिप मिळते. या कार्डची वार्षिक फी 2,999 रुपये आहे.

अॅक्सिस बँक

अॅक्सिस बँक विस्तारा सिग्नेचर ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी क्लब विस्तारा सिल्व्हर मेंबरशिप ऑफर करतं. यासोबतच खर्चात माइलस्टोन गाठल्यावर 4 कॉम्प्लिमेंटरी प्रीमियम इकॉनॉमी तिकिटे देखील देतं. कार्डधारकाला दर तीन महिन्यांनी दोन कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये एक्सेस मिळतो. 200 रुपये खर्च केल्यावर ते 4 क्लब विस्तारा पॉइंट देखील देतं. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 3,000 रुपये आहे.