Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Life Certificate: निवृत्ती वेतनधारकांना द्यावा लागतो हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Pensioners

Digital Life Certificate: निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ते हयात असल्याचे प्रमाणपत्र (Jeevan Pramaan) सादर करावे लागते, ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.

Digital Life Certificate: ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन (Pension) हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात आणि गरजेच्या परिस्थितीत मदत करते. निवृत्तीनंतर, पेन्शनधारकांना (Pensioner's) त्यांचे लाइफ सर्टिफिकेट (Jeevan Pramaan) बँकेसारख्या अधिकृत पेन्शन वितरण संस्थेकडे जमा करावे लागते, त्यानंतरच त्यांना पेन्शन दिली जाते. जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, निवृत्तीवेतनधारकाला अधिकृत पेन्शन वितरण संस्थेकडे वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ते हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शनधारकांना पेन्शन मिळवण्यासाठी आणि लाइफ सर्टिफिकेट  मिळविण्यासाठी वितरण संस्थेमध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे ही सर्वात मोठी समस्या आहे, यामुळे वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेले व्यक्ती प्रत्येक वेळी स्वतः वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत अशा पेन्शनधारकांना समस्या निर्माण होतात. यासोबतच अनेक सरकारी कर्मचारी (Government employees) सेवानिवृत्तीनंतर कुटुंबासह राहण्यासाठी इतरत्र राहायला जातात, त्यामुळे त्यांना पेन्शन मिळण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकारने त्यात बदल घडून आणला आहे, आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकत, ते मिळवण्याची प्रोसेस पुढे दिली आहे. 

डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी असा करा अर्ज 

'डिजिटल इंडिया' (Digital India) या स्वप्नपूर्तीकडे नेणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी केंद्र सरकारच्या(Central Govt) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाने आवश्यक ते तंत्रज्ञान पुरविले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे पेन्शनरांचा आधार कार्ड (Aadhar Card) नंबर आणि त्यांच्या बॉडी डिटेल्स म्हणजे हाताचे ठसे, देहावरील ओळख पटविण्याचा खूणा, माहितीची नोंद केली जाते. शारीरिक माहितीची नोंद करणारी विशेष सोय या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे.  केंद्र सरकारच्या ज्या पेन्शनरांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्यांची नोंदणी 'जीवन प्रमाण' या वेबसाइटवर अर्ज करणे आवश्यक आहे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आणि त्यांच्या पेन्शन वितरणाच्या अर्जावर डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची माहिती केंद्र सरकारच्या जीवनप्रमाणबाबतच्या स्वतंत्र वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे फायदे 

वृद्धांना कोणत्याही कार्यालयात जास्त वेळ उभे राहावे लागणार नाही. 
जेणेकरुन वृद्धांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
जे निवृत्तीवेतनधारक आहेत ते राहण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले तर ते केवळ ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन सादर केल्याने ज्येष्ठ निवृत्ती वेतनधारकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
2014 पासून भारतातील सुमारे 80 लाख ते 90 लाख पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्राचा लाभ मिळाला.

 लाईफ सर्टिफिकेटऑफलाइन कसे मिळवायचे?

जर तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये लाईफ सर्टिफिकेट मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्रात जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी CSC ऑपरेटरकडे अर्ज करावा लागेल. त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील, अर्ज भरल्यानंतर तुम्हाला CSC ऑपरेटरला काही शुल्क द्यावे लागेल. अर्जाची हार्ड कॉपी (Hard copy) सोबत ठेवा. अशा प्रकारे तुमचा अर्ज ऑफलाइन मोडमध्ये केला जाईल. काही काळानंतर तुम्हाला तुमचे लाईफ सर्टिफिकेट मिळेल. याशिवाय तुमची पेन्शन कुठे येते किंवा तुम्ही सरकारी कार्यालयात जाऊनही अर्ज करू शकता.