• 26 Mar, 2023 14:05

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATM Franchise: पाच लाखाची गुंतवणूक करून मिळवा ATM ची फ्रांचायजी! 70 हजार महिना कमविण्याची संधी!

ATM

ATM- Franchise ही एक उत्तम व्यवसाय संधी आहे जी तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून चांगले मासिक उत्पन्न मिळविण्याची संधी देते. कोणत्याही बँकेकडून एटीएम फ्रँचायझी मिळवायची असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. जाणून घ्या काय आहे प्रक्रिया!

ATM Franchise Business: तुम्ही कोणत्याही व्यवसायात हात घातलात तरी तो यशस्वीपणे चालवणे कठीण आहे. कारण सगळे व्यवसाय शेवटी आव्हानात्मक असतात. परंतु, जर एखाद्याने तुम्हाला सांगितले की तुम्ही साधारणतः 5 लाख रुपयांची एकरकमी आणि पुन्हा मिळणारी गुंतवणूक करून दरमहा 60,000-70,000 रुपये कमवू शकता! अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु होय हे शक्य आहे.चला तर आज आम्ही तुम्हाला एटीएम व्यवसाय फ्रँचायझीच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत. एक चांगले मासिक उत्पन्न मिळविण्याचा हा व्यवसाय भारतात अनेक लोक करत आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.

ATM म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर SBI ATM, ICICI ATM, HDFC ATM, PNB ATM, UBI ATM, आदी बँकांचे एटीएम आले असणार. या बँकांचे ATM स्वतः बँकांनी बसवले असणार असा जर तुमचा समज असेल तर थांबा! बँका स्वतः सर्व ठिकाणी असे बँक एटीएम बसवत नाही. वर्दळीच्या ठिकाणी जे एटीएम बसवलेले असतात ते प्रत्यक्षात बँकांनी कंत्राटदार म्हणून नियुक्त केलेल्या यंत्रणेद्वारे बसवले जातात. सदर कंत्राटदार विविध ठिकाणी एटीएम बसवण्याचे काम पूर्ण करत असतात, प्रत्यक्ष बँकेचा त्यात सहभाग नसतो.

भारतात एटीएम बसवण्यासाठी बहुतांश बँकांचे टाटा इंडिकॅश (Tata Indicash), मुथूट एटीएम (Muthoot ATM) आणि इंडिया वन एटीएमसोबत (India One ATM) करार आहेत.  त्यामुळे, तुम्हाला SBI किंवा इतर कोणत्याही बँकेकडून एटीएम फ्रँचायझी मिळवायची असल्यास तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारेच अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. हे सर्व करताना सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे, कारण एटीएम फ्रँचायझीच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल करून फसवणूक देखील केली जाते. अशी अनेक प्रकरणे अलीकडच्या काळात समोर आली आहेत.

ATM फ्रँचायझीसाठी आवश्यक गोष्टी

एटीएम केबिन सेट करण्यासाठी, तुमच्याकडे 50 ते 80 चौरस फूट क्षेत्रफळ जागा असायला हवी.  ही जागा इतर एटीएमपासून किमान 100 मीटर अंतरावर असली पाहिजे आणि लोकांना ते सहज दिसेल अशा ठिकाणी ATM बसवले गेले पाहिजे. ज्या परिसरात आधीपासूनच ATM आहेत, त्या ठिकाणी शक्यतो परवानगी दिली जात नाही. 

ATM च्या ठिकाणी वीज कायम उपलब्ध असणे आवश्यक आहे, आणि किमान 1kW वीज कनेक्शन देखील आवश्यक आहे.  ATM केबिनसाठी काँक्रीटचे छप्पर आणि दगडी भिंती असलेली एक कायमस्वरूपी इमारत असावी.  व्ही-सॅट स्थापित करण्यासाठी तुम्हाला सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

ATM फ्रँचायझीसाठी आवश्यक कागदपत्रे

● ओळखपत्र - आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड
● पत्त्याचा पुरावा - रेशन कार्ड, वीज बिल
● बँक खाते आणि पासबुक
● छायाचित्र, ई-मेल आयडी, फोन नं.
● कंपनीला आवश्यक असलेले इतर कागदपत्रे/फॉर्म
●  जीएसटी क्रमांक
● कंपनीला आवश्यक असलेली आर्थिक कागदपत्रे

एटीएम फ्रँचायझीमधून मिळणारे उत्पन्न

एटीएम फ्रँचायझीच्या बहुतांश प्रकरणांमध्ये, तुम्ही एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करता आणि परवानगी घेता तेव्हा तुम्हाला सुरक्षा ठेव म्हणून 2 लाख रुपये आणि ऑपरेटिंग कॅपिटल म्हणून 3 लाख रुपये देण्यास सांगितले जाते. ही संपूर्ण गुंतवणूक, प्रत्येक कंपनीनुसार, बँकेनुसार बदलते हे लक्षात असू द्या?ATM बसवल्यानंतर जेव्हा वापरकर्ते ते वापरण्यास सुरुवात करतील, त्यानंतर प्रत्येक रोख व्यवहारासाठी 8 रुपये, आणि बॅलन्स चेक आणि फंड ट्रान्सफर सारख्या नॉन-कॅश व्यवहारांसाठी 2 रुपये दिले जातात.


(महत्वाची सूचना: हा लेख  एटीएम फ्रँचायझी समजून घेण्यासाठी आहे.गुंतवणूक करण्याआधी सगळे नियम तपासून घेणे आवश्यक आहे.)