Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Bull: जॉर्ज सोरोस, सक्सेसफुल इन्वेस्टर आणि मोस्ट जेनेरस गिव्हर!

Market Bull George Soros

Market Bull George Soros: अमेरिकन फायनान्सर, लेखक, व्यापारी, राजकीय कार्यकर्ता तसेच ते एक उत्तम इन्व्हेस्टर म्हणून जॉर्ज सोरोस ओळखले जातात. त्यांच्या वैविध्यपूर्ण इन्वेस्टींग स्ट्रॅटेजीनेच त्यांना जगातील श्रीमंतांच्या यादीत बसवले.

बुडापेस्ट, हंगेरी (Budapest, Hungry) येथे जन्मलेले जॉर्ज सोरोस (George Soros) एक अमेरिकन फायनान्सर, लेखक, व्यापारी, राजकीय कार्यकर्ता तसेच ते एक उत्तम इन्व्हेस्टर होते. त्यांच्या इन्वेस्टींग स्ट्रॅटेजीनेच त्यांना जगातील श्रीमंतांच्या यादीत बसवले. उदारमतवादी आणि समाजकारणाचे सर्मथन करणारे जॉर्ज सोरोस (George Soros) हे आहेत आपले आजचे मार्केट बुल (Market Bull). चला तर मग जाणून घेऊयात जॉर्ज सोरोस यांच्याबद्दल.

जॉर्ज सोरोस यांचे सुरुवातीचे आयुष्य

एका समृद्ध ज्यू कुटुंबात जन्मलेल्या सोरोसचे यांचे बालपण 1944 मध्ये हंगेरीमध्ये आल्याने संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यांना छळछावणीत पाठवले जाऊ नये म्हणून खोट्या कागदपत्रांचा वापर करून त्यांचे कुटुंब तिथून बाहेर पडले होते. संपूर्ण कुटुंबासह ते 1947 मध्ये लंडनला गेले. लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी (London School Of Economics) सोरोस यांनी कार्ल पॉपर (Karl Popper) यांच्या हाताखाली तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. पण त्यांनी तत्त्वज्ञानी बनण्याची त्यांची इच्छा सोडून दिली आणि ते लंडन मर्चंट बँक सिंगर अॅण्ड फ्रीडलॅण्डमध्ये (Singer & Friedlander) सामील झाले. 1956 मध्ये ते न्यूयॉर्क (New York) शहरात गेले, जिथे त्यांनी सुरुवातीला युरोपियन सिक्युरिटीजमध्ये (European Securities) अॅनालिस्ट म्हणून काम केले आणि वेगाने आपली छाप पाडली.

सोरोस यांचे इन्व्हेस्टमेंटमधले करिअर 

1973 मध्ये सोरोस यांनी, सोरोस फंड (आताचा क्वांटम एंडोमेंट फंड-Quantum Endowment Fund)ची स्थापना केली. हा एक हेज फंड होता. ज्याने नंतर अनेक संबंधित कंपन्यांची निर्मिती केली. त्यांच्या धाडसी गुंतवणुकीच्या निर्णयांमुळे फंड वेगाने वाढू लागला, परंतु त्यांचे सर्वच निर्णय यशस्वी ठरले नाहीत. ऑक्टोबर 1987 च्या स्टॉक मार्केट क्रॅशमध्ये त्यांनी लावलेले अंदाज अचूक होते. पण जपानमधील स्टॉक मार्केट कोसळण्याचा त्यांचा अंदाज चुकीचा ठरला आणि त्याचा त्यांना फटका देखील बसला.

पाऊंडच्या घसरणीचा फायदा

सप्टेंबर 1992 मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने पाउंड स्टर्लिंगचे अवमूल्यन केले तेव्हा सोरोस यांच्याकडे लोक पौराणिक फायनान्सर म्हणून पाहू लागले. परंतु खरे चित्र काही वेगळेच होते. त्याच्या क्वांटम ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून, सोरोसने अवमूल्यनाच्या आधीच्या दिवसांत अब्जावधी पाऊंडची विक्री केली होती. या पाऊंडची खरेदी करण्यासाठी सोरोस यांनी उधारीवर पैसेदेखील घेतले होते. नंतर सोरोसने परत पाउंड विकत घेतले, त्याचबरोबर त्यांनी उधारीवर घेतलेल्या पैशांची परतफेड केली आणि सुमारे 1 बिलियन डॉलर्सचा नफा कमावला. इतरांना देखील पाऊंडच्या घसरणीचा फायदा झाला, परंतु सोरोसच्या ऑपरेशन्सचे प्रमाण इतर सर्वांपेक्षा कमी झाले आणि गॅम्बिटमुळे त्याला "बँक ऑफ इंग्लंड तोडणारा माणूस" असे टोपणनाव मिळाले.

जपानी येनचा अंदाज चुकला आणि कोट्यवधींचे नुकसान

1994 मध्ये, त्यांचे अंदाज तात्पुरते तरी अपयशी ठरले. जपानी येन विरुद्ध डॉलर वाढेल, असा सोरोस यांचा अंदाज होता. पण त्याऐवजी, डॉलर वर्षभर घसरला आणि क्वांटम फंडने फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी शेकडो दशलक्ष रुपये गमावले. याकाळात सोरोस यांचे वैयक्तिक व त्यांच्या फंडचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले. ओरोस यांनी हे नुकासन 1999 मध्ये इंटरनेट स्टॉक्सच्या मदतीने भरून काढले. यानंतर पुन्हा एकदा त्यांचा फंड फायद्यात येऊ लागला. 

इनसायडर ट्रेडिंग केल्याप्रकरणी दोषी

डिसेंबर 2002 मध्ये एका फ्रेंच न्यायालयाने सोरोसला आर्थिक सेवांचा समावेश असलेल्या 1988 च्या स्टॉक डीलसाठी इनसाइडर ट्रेडिंगसाठी दोषी ठरवले. कंपनी Société Générale, आणि सोरोस ह्यांना €2.2 दशलक्ष पौंड म्हणजेच $2.9 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. सोरोसने या निर्णयावर अपील केले, परंतु 2006 मध्ये Cour de Cassation (फ्रान्सचे सर्वोच्च न्यायालय) यांनी शिक्षा कायम ठेवत सोरोस ह्यांचा अपील नाकारला. हेज फंडासंबंधी नवीन फेडरल नियमांना तोंड देत, सोरोस यांनी जुलै 2011 मध्ये घोषित केले की क्वांटम एंडोमेंट फंड यापुढे बाहेरील गुंतवणूकदारांचे पैसे मॅनेज करणार नाही. त्याऐवजी, ते फक्त सोरोस आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता हाताळेल असे सोरोस यांनी जाहीर केले.

मोस्ट जेनेरस गिव्हर, जॉर्ज सोरोस

सोरोस यांनी आपल्या फंडाच्या माध्यमातून झालेल्या नफ्याचा वापर करून ओपन सोसायटी फाऊंडेशन नावाची संस्थाही सुरू केली. सोरोस यांचे 2021 मध्ये एकूण नेटवर्थ 8.6 बिलियन डॉलर्स इतके होते. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या फाऊंडेशनला 32 बिलियन डॉलर्सची देणगी दिली. त्यांनी आपल्या एकूण संपत्तीतील 64 टक्के संपत्ती गरजू लोकांमध्ये वाटली. त्यामुळे 'फोर्ब्सने त्यांना “मोस्ट जेनेरस गिव्हर (Most Generous Giver)” म्हटले.