Full-Ride Scholarship: स्कॉलरशिपचे वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारानुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. काही स्कॉलरशिप या देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी दिल्या जातात. तर काही स्कॉलरशिप या फक्त परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. पण यामध्येही स्कॉलरशिप देण्याचे निकष आणि नियम वेगवेगळे असतात. सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप या सर्व खर्च करत नाहीत. त्यातील काही मोजक्या स्कॉलरशिपच 100 टक्के खर्च देतात.
100 टक्के खर्च उपलब्ध करून देणाऱ्या स्कॉलरशिपला फुल राईड स्कॉलरशिप (Full-Ride Scholarship) असे म्हटले जाते. यामध्ये ट्युशन फी आणि कॉलेजशी संबंधित इतर खर्चाचा समावेश होतो. जसे की, राहण्याचा खर्च, प्रवास खर्च, इन्शुरन्सचा हप्ता आणि काही प्रमाणात खाण्याचा खर्चदेखील समावेश होतो. 100 टक्के शिष्यवृत्तीचा हाच उद्देश असतो की, त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. त्याचे सर्व शिक्षण पूर्णत: मोफत होते.
फुल राईड स्कॉलरशिपच्या माध्यमातून काही विद्यापीठे आणि कॉलेजेस विशेष प्रोग्रॅम आणि इंटर्नशीप कार्यक्रम राबवतात. या अशा स्पेशल प्रोग्रॅममधून विद्यार्थ्यांना फक्त ट्युशन फी दिली जाते. इतर खर्च विद्यार्थ्यांना स्वत: करावा लागतो. त्यामुळे तुम्ही परदेशात शिकण्यासाठी जात असाल आणि 100 स्कॉलरशिप शोधत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
Table of contents [Show]
फुल राईड स्कॉलरशिपचे प्रकार
फुल राईड स्कॉलरशिप ही विद्यापीठ, कॉलेज किंवा खाजगी संस्थांद्वारे शैक्षणिकदृष्ट्या हुशार मुले आणि खेळामध्ये किंवा विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. फुल राईड स्कॉलरशिप या 3 प्रकारच्या असतात.
गुणवत्तेवर आधारित
एखाद्या विद्यार्थ्याच्या अलौकिक अशा शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित फुल राईड स्कॉलरशीप दिली जाते. हा सर्वांत सर्वमान्य प्रकार आहे. गुणवत्तेवर आधारित असलेली ही स्कॉलरशिप देताना विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, लिडरशीप स्किल आणि समाजातील किंवा विविध क्षेत्रातील सहभाग यावर आधारित दिली जाते.
आर्थिक निकषांवर आधारित
आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारची स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण उत्पादन तपासून त्यानुसार स्कॉलरशिप दिली जाते. अर्थात यामध्ये फक्त विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहिली जात नाही. त्याची शैक्षणिक गुणवत्तादेखील तपासली जाते.
सरकारी स्कॉलरशिप
सरकारकडूनदेखील वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप दिल्या जातात. या स्कॉलरशिपच्या माध्यामातून सरकार परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक उत्पन्न आणि आरक्षणानुसार स्कॉलरशिप दिली जाते.
बऱ्याचदा पालक आणि विद्यार्थ्यांचा फुल राईड स्कॉलरशिप आणि पूर्ण ट्यूशन फी स्कॉलरशिप यामध्ये गोंधळ होतो आणि जेव्हा स्कॉलरशिप मिळते. तेव्हा त्यातील फरक लक्षात येतो. हा गोंधळ टाळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात.
फुल राईड स्कॉलरशिपमध्ये ट्यूशन फी, राहण्याची सोय, इ्न्शुरन्स प्रीमिअ, विमानाचे प्रवास भाडे आणि इतर खर्चाचा समावेश होतो. पण फुल ट्यूशन स्कॉलरशिपमध्ये फक्त ट्यूशन फी कव्हर केली जाते. इतर खर्च विद्यार्थ्याला करावे लागतात. जसे की, राहण्याचा, प्रवासाचा, लॅबचा आणि खाण्या-पिण्याचा खर्च विद्यार्थ्याला करावा लागतो.