Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FTX Crypto Scam: 'FTX'चा माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेडवर अफरातफर केल्याचा ठपका, चौकशी होणार

FTX Crypto Scam

FTX Crypto Scam: अमेरिकेतील दुसरा मोठा एक्सचेंज असलेल्या FTX मधील घोटळ्यातील संशयाची सुई या एक्सचेंजचा माजी सीईओ सॅम बॅंकमन फ्रेड याच्यावर आहे. बँकमन फ्रेडने क्रिप्टो मार्केटमधील दोन क्रिप्टो करन्सीजमध्ये अफरातफर केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

FTX क्रिप्टो एक्सचेंजमधील कथित घोटाळ्याप्रकणी या एक्सचेंजचा माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेड अडचणीत येण्याची शक्यता आहे. बँकमन फ्रेडने मे महिन्यात क्रिप्टो मार्केटमधील दोन क्रिप्टो करन्सीजमध्ये अफरातफर (Sam Bankman-Fried manipulated the market for two cryptocurrencies) केल्याचा संशय सरकारी वकिलाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी  बँकमन फ्रेडची चौकशी होणार आहे.

गेल्या महिन्यात FTX हा क्रिप्टो एक्सचेंज जवळपास 1 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाल्याने दिवाळखोरीत निघाला होता.यामुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी अमेरिकेतील तपास यंत्रणांनी आणि सरकारी वकिल (U.S. federal prosecutor) चौकशी सुरु केली आहे.या घोटाळ्यात बँकमन फ्रेड याने मे महिन्यात दोन क्रिप्टो करन्सीजमध्ये अफरातफर केल्याचा संशय सरकारी वकीलाने व्यक्त केला आहे. 

बँकमनने FTX आणि अल्मेडा रिसर्च या दोन कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी TerraUsd आणि Luna या दोन क्रिप्टो करन्सीजच्या किंमतीमध्ये अफरातफर केल्याचा संशय आहे. त्यामुळे या कंपन्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील प्रमुख एजन्सींनी FTX प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. FTX चे ज्या देशात मुख्यालय आहे त्या 'बहामाज'मधील तपास यंत्रणाही चौकशी करत आहे.

नुकताच सॅम बँकमन फ्रेड याने एका जाहीर कार्यक्रमात FTX घोटाळ्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.आपल्या हातून चुका होत गेल्या मात्र आपला कधीच फसवणुकीचा हेतू नव्हता, असे फ्रेड याने सांगितले.कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव आणि निधीचा गैरवापर या अनागोंदीमुळे 'FTX'मधील सर्वात मोठा गुंतवणूक असलेल्या बायनान्सने आपली गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर सीईओ फ्रेड याने राजीनामा देऊन पळ काढला होता.'FTX'मधील गुंतवणूकदार Alameda च्या भूमिकेबाबत फ्रेड याने यावेळी संशय व्यक्त केला.FTX-Alameda या दोन कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांबाबत आपल्याला माहित नाही, असे त्याने स्पष्ट केले.