Viral News: हल्लीचा जमाना 'OTT' प्लॅटफॉर्मचा आहे. आपण नीट पाहिले तर लक्षात येईल की, आजकालचा बऱ्यापैकी सर्वोत्तम आशय हा OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. बरेच मोठमोठे दिग्दर्शक त्यांच्या सिरीज आणि चित्रपट हल्ली OTT प्लॅटफॉर्मवर लॉन्च(Launch) करून बक्कळ कमाईही करत आहेत. कोविडच्या महामारी दरम्यान टेलिव्हिजनच्या तुलनेत OTT प्लॅटफॉर्मने मोठ्या प्रमाणावर आशय रिलीज केला. ग्रामीण आशयापासून(Rural Content) ते अगदी इंटरनॅशनल आशयापर्यंत(International Content) सगळ्याच गोष्टी आपल्याला हल्ली Netflix, amazon prime, Disney Hotstar यासारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहेत. पण हे सगळं पाहायचं असेल तर तुम्हाला मासिक किंवा त्रैमासिक सबस्क्रिप्शन(Subscription) घ्यावे लागते. त्यासाठी 300 रुपयांपासून सबस्क्रिप्शन प्लॅन चालू होतात. पण मी जर तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगितली ज्यावर तुम्ही फ्रीमध्ये हेच सर्व चित्रपट आणि सिरीज पाहू शकता ते पण एकही रुपया खर्च न करता. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
साईटचे नाव काय?
हल्ली सोशल मीडियावर बरेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर(Social Media Influencer) यासंदर्भात व्हिडीओ बनवून याबद्दलची माहिती देत आहेत. Netflix, amazon prime, Disney Hotstar वरील सर्व सिरीज आणि चित्रपट तुम्ही goku.to या वेबसाईटवर फ्रीमध्ये पाहू शकता.
यासाठी तुम्हाला Google Chrome वर जाऊन goku.to सर्च करावे लागेल. सर्च केल्यानंतर लगेचच तुम्हाला ही वेबसाईट ओपन(Open) होईल. यामध्ये तुम्ही फेसबुक(Facebook), ईमेल(Email), गुगल अकाऊंट(Google account) इत्यादीच्या माध्यमातून लॉग इन(Log in) करू शकता.
या साईटवर काय काय पाहायला मिळेल?
जगभरातील वेगवेगळ्या प्रकारचा आशय तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. Netflix, amazon prime, Disney Hotstar वरील सर्व सिरीज आणि चित्रपट तुम्ही इथे फ्रीमध्ये पाहू शकता. होमपेजवर तुम्हाला country हा एक ऑप्शन देण्यात आला आहे. 36 हून अधिक देशांचा आशय तुम्हाला येथे फ्री मध्ये पाहायला मिळत आहे. फॅमिली(Family), अनिमेशन(Animation), ऍक्शन(Action), क्राईम(Crime), किड्स(Kids), डॉक्युमेंट्री(Documentary), लव्ह स्टोरी(Love Story) यासारख्या अनेक वेगवगेळ्या जॉनरला यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. येथील चित्रपट आणि सिरीज तुम्हाला डाउनलोड ही करता येणार आहे आणि ही डाउनलोड केलेली सिरीज तुम्ही कधीही आणि कुठेही पाहू शकता.
साईट कितपत सुरक्षित आहे?
या साईटवर भलेही तुम्हाला फ्रीमध्ये कन्टेन्ट पाहायला मिळत असला तरीही यावरील सुरक्षितेसंदर्भात(Safety) अजूनही शाश्वती देण्यात आलेली नाही किंवा कोणीही यासंदर्भात विश्लेषणात्मक सविस्तर माहिती दिलेली नाही. परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मार्गदर्शनाखाली सध्या लोक ही साईट वापरात आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही साईट वापरणार असाल तर थोडी काळजी नक्कीच घ्या.