Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel Plans: तुम्हाला Airtel चे हे 3 भन्नाट प्लॅन्स माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Airtel Recharge Plan

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, Amazon Prime आणि Disney Hotstar देखील मोफत मिळणार आहे.

Airtel Plans: सध्या मोबाईल रिचार्ज(Mobile recharge) प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत याच गोष्टीचा विचार करून ग्राहकांसाठी एअरटेलने 3 भन्नाट प्लॅन्स जारी केले आहेत. ग्राहक वारंवार रिचार्ज करण्याऐवजी दीर्घकाळाची वैधता असलेले प्लॅन निवडतात ही भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन  Airtel कंपनीने दीर्घकाळ वैधतेचे 3 प्लॅन्स जारी केले आहेत. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना  Hotstar चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन(subscription),  Amazon Prime ची मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हाईस कॉलसह(Unlimited voice calling) मोफत SMS सेवा देखील मिळणार आहे. चला तर कोणकोणते प्लॅन्स आहेत हे जाणून घेऊयात. 

499 रुपयांचा प्लॅन 

हा  Airtel चा 499 रुपयांचा दीर्घ कालावधीसाठीचा प्लॅन आहे. हा प्लॅन 3 महिन्यांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हाईस कॉलसह दररोज 2 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 100 SMS ची सेवा दिली जाणार आहे. यासोबत कंपनीकडून थॅक्स अॅप(Thanks App) आणि फ्री हॅलो ट्युन्स(free hello tunes) तसेच विंक म्युझिक(Wynk Music) यासारखे अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहेत.  Disney Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन देखील 3 महिन्यांसाठी दिले जाणार आहे. 

699 रुपयांचा प्लॅन  

Airtel आपल्याला या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये  Airtel अमर्यादित व्हाईस कॉलसह दररोज 3 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये 100  SMS देखील दिले जात आहेत. यासोबत कंपनीकडून थॅक्स अॅप आणि फ्री हॅलो ट्युन्स तसेच विंक म्युझिक यासारखे अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये  Amazon    Prime चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. 

999 रुपयांचा प्लॅन  

या प्लॅनमध्ये  Airtel 84 दिवसांची रिचार्ज वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये  Airtel अनलिमिटेड अमर्यादित व्हाईस कॉलसह दररोज 2.5 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये 100  SMS देखील दिले जात आहेत. यासोबत कंपनीकडून थॅक्स अॅप आणि फ्री हॅलो ट्युन्स तसेच विंक म्युझिक यासारखे अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये  Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.