• 27 Mar, 2023 06:06

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SugarBox अ‍ॅपद्वारे फ्री इंटरनेट आणि रिचार्ज शिवाय पाहता येणार OTT चित्रपट

Sugarbox app

SugarBox App: शुगरबॉक्स अ‍ॅपच्या मदतीने युजर्सला इंटरनेटशिवाय OTT अ‍ॅपवर चित्रपट आणि शो पाहता येणार आहे. याशिवाय, इतर ऑनलाईन सेवा आणि ऑनलाईन शॉपिंगचा लाभ युजर्स घेऊ शकतात.

आजच्या घडीला इंटरनेट (Internet) हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहे. आपण कोणतेही काम इंटरनेट शिवाय करूच शकत नाही. अगदी कंटाळा आला तरी आपल्याला इंटरनेटची गरज ही पडतेच. या इंटरनेटचा वापर करायचा असेल, तर आपल्याला टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या प्लॅनचा रिचार्ज (Recharge Plan) करावा लागतो. पण जर तुम्हाला फुकटात इंटरनेट वापरायला मिळाले तर?

आज महामनी (MahaMoney) तुम्हाला अशाच एका मोफत वायफाय सेवेबद्दल माहिती देणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मोफत इंटरनेटचा आनंद लुटू शकता. यासाठी तुम्हाला शुगरबॉक्स (SugarBox) हे अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे लागेल. तुम्ही हे अ‍ॅप तुमच्या Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसमध्ये डाउनलोड करून वापरू शकता. या अ‍ॅप अंतर्गत, युजर्स इंटरनेटशिवाय OTT अ‍ॅपवर चित्रपट आणि शो सहज पाहू शकतात. याशिवाय, तुम्ही इतर ऑनलाईन सेवांचा आणि ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) लाभ घेऊ शकता. यामध्ये Buy Now Pay Later ही सुविधा दिली आहे. या शुगरबॉक्सचा वापर कसा करायचा, चला जाणून घेऊयात.

असा करा SugarBox App चा वापर

मोफत वायफाय सेवेचा लाभ घेण्यासाठी Apple App Store आणि Google Play Store वरून SugarBox अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा
त्यानंतर सेवेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या मोबाईलची इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करा.

SugarBox अ‍ॅपची वायफाय कनेक्टिव्हिटी ऑन करून SugarBox वायफायशी कनेक्ट करा. याठिकाणी तुम्हाला हाय क्वॉलिटीचे म्युझिक आणि शो (Free Music & Show) विनामूल्य पाहता येतील.

तुम्ही हे अ‍ॅप तुमच्या स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवरही कनेक्ट करून वापरू शकता. या वायफाय सेवेची रेंज 100 मीटर मर्यादित आहे. यामध्ये यूजर्स इंटरनेटशिवाय ओटीटी अ‍ॅप्सचा लाभ सहज घेऊ शकतो. तसेच, या अ‍ॅपद्वारे गेमिंग आणि सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील वापरु शकतो

विमान प्रवासात होईल मदत

तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर तुमचा कंटाळवाणा विमान प्रवास (Flight Travel) मजेशीर करण्यासाठी शुगरबॉक्स मदत करेल. तुम्हाला ही सेवा विमानप्रवास करतानाही वापरता येणार आहे.  थोडक्यात काय तर, विमानामध्ये फोन एअरप्लेन मोडवर ठेवल्यानंतर तुमचा प्रवास यापुढे कंटाळवाणा होणार नाही. यापुढे तुम्ही विमानातही OTT अ‍ॅप्स वापरू शकता. तसेच चित्रपट आणि शो मोफत पाहू शकता. याशिवाय, विमान प्रवासात गेमिंग आणि ऑनलाईन शॉपिंगचाही (Online shopping) आनंद लुटू शकता.