Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5G Internet Speed: 5G इंटरनेटद्वारे तुम्हाला किती MBPS स्पीड मिळू शकतो?

5G internet speed

2023 वर्षात मोबाईल इंटरनेटमध्ये अमूलाग्र बदल होणार असून नेटवर्क स्पीड आणखी वाढणार असल्याचे स्पीड टेस्ट सेवा पुरवणाऱ्या नेटवर्क इंटेलिजन्स कंपनी ओक्लाने म्हटले आहे. देशभरामध्ये 5G इंटरनेचा विस्तार आणखी वेगाने होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

2023 वर्षात मोबाईल इंटरनेटमध्ये अमूलाग्र बदल होणार असून नेटवर्क स्पीड आणखी वाढणार असल्याचे स्पीड टेस्ट सेवा पुरवणाऱ्या नेटवर्क इंटेलिजन्स कंपनी ओक्लाने म्हटले आहे. देशभरामध्ये 5G इंटरनेचा विस्तार आणखी वेगाने होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी अवकाशात सोडण्यात आलेल्या लो-अर्थ ऑर्बिटमधील सॅटेलाइटमुळे इंटरनेट क्षेत्रात चालू वर्षामध्ये मोठा बदल होण्याचा अंदाजओक्ला कंपनीने केला आहे. जीओ, एअरटेल या कंपन्यांनी भारतातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून यामध्ये वगाने विस्तार होत आहे.

5G इंटरनेट सेवेचा स्पीड किती असेल?

विविध इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनुसार 5G इंटरनेट सेवेचा स्पीड कमी जास्त आहे. 16.27 MBPS ते 809.95 MBPS इतका स्पीड 5G इंटरनेट सेवेद्वारे मिळू शकतो. यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. ओक्लाने केलेल्या ग्राहकांच्या सर्व्हेनुसार ८९ टक्के नागरिकांनी 5G सेवेत कनव्हर्ट होण्याची तयारी दर्शवली.  जीओची देशभरातील सुमारे ७२ शहरांमध्ये 5G ची सुविधा पोहचली आहे. 5G इंटरनेटमुळे फास्ट ब्राऊझिंग तसेच डाऊनलोडिंगचा अनुभव ग्राहकांना मिळतोय.

मोबाईल इंटरनेटचा स्पीड किती असेल?

ओक्लाच्या म्हणण्यानुसार मागील वर्षभरात एकंदर मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वसामान्य इंटरनेट स्पीड १८.२६ एमबीपीएस इतका होता. तसेच ग्लोबल स्पीड टेस्टमध्ये भारताची रँकिंगही सुधारली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय जागतिक इंटरनेट स्पीडमध्ये ११२ वी रँक होती. त्यामध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये वाढ होऊन १०५ व्या स्थानावर भारत आला आहे.

सॅटेलाइट इंटरनेटचे प्रमाण वाढणार

भारतामध्ये चालू वर्षात आणि यापुढे सॅटेलाईट इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. लो-अर्थ-ऑर्बिट कक्षेत सॅटेलाइटमुळे इंटरनेट भारतातील अशा दुर्गम भागात पोहचेल जेथे ब्रॉडबँड सुविधा अद्याप पोहचली नाही. सध्या भारतामध्ये फक्त १० टक्के ब्रॉडबँड सुविधा वापरली जाते. त्यामुळे सॅटेलाइट इंटरनेट भारताच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा पोहचवू शकतो. दुर्गम भागामध्ये वायर नेटवर्क उभारण्यात अनेक अडचणी आहेत, त्याच सॅटेलाइट इंटरनेट चांगला पर्याय आहे.