सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत आरक्षण लागू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यातील अनुसूचित जाती आणि मागासवर्गातील विद्यार्थी ‘फ्री कोचिंग योजने’चा लाभ घेऊ शकतील. coaching.dosje.gov.in या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून या योजनेची माहिती घेऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. 1 मे ते 31 मे दरम्यान रजिस्ट्रेशन करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 3500 जागांसाठीच ही योजना आहे. तसेच यातील 60 टक्के जागा या जे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी आहेत. तर उर्वरित 40 टक्के जागा ज्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रम पूर्ण केला असेल व 12 वी परीक्षा उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी आहे.
‘फ्री कोचिंग’ योजनेचे फायदे
या योजने अंतर्गत जे लाभार्थी सहभागी होतील त्यांना जास्तीत जास्त 1 लाख 20 हजार रुपये आणि नऊ महिने किंवा शिकवणीच्या काळापर्यंत 4 हजार रूपये स्टायपेंड दिला जाणार आहे. सुरुवातीला शिकवणीची फी लाभार्थी विद्यार्थ्याला भरावी लागणार आहे. या योजनेसाठी रजिस्टर करताना फी भरलेली पावती अपलोड केल्यानंतर भरलेली सर्व फी तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
योजनेचा लाभ कोणाला
अनुसूचित जाती आणि मागासवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एससी (SC) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी योजना लागू
- रेल्वे रिकरुटमेन्ट बोर्ड (RRB )
- स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC )
- स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन (SPSC)
- युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)
- नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA)
- कॉम्बिनेड डिफेन्स सर्व्हिस (CDS)
- जॉईंट इंटरन्स exam (JEE)
- नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट (NEET)
- कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट (CAT)
- कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट (CMAT)
- इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (IES)
- ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्सामिनेशन (GRE )
- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट (GMAT)
अशाच प्रकारच्या आणखी काही स्पर्धा परीक्षा आहेत. ज्याची फ्री कोचिंग योजनेतून परीक्षेची तयारी करता येऊ शकते.