Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Save money : खर्च जास्त होतोय? पैसे वाचवायचे आहेत? 'या' काही सोप्या टिप्स...

Save money : खर्च जास्त होतोय? पैसे वाचवायचे आहेत? 'या' काही सोप्या टिप्स...

Save money : महागाईमुळे खर्च जास्त अन् बचत कमी होतेय. अशावेळी गुंतवणूक करून चांगला परतावा देणाऱ्या योजनांवर अनेकांचा भर असतो. पैशांसोबत मोठी जबाबदारीही येते की केवळ चांगला परतावा मिळण्यासाठी यात पुन्हा गुंतवणूक करावी मात्र यासोबतच घर खरेदी, मुलांचं शिक्षण आणि लग्न अशा विविध बाबीही समोर ठेवाव्या लागतात.

विविध योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करत असताना आपल्या गरजा (Needs) ओळखणं क्रमप्राप्त ठरतं. आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा हे दोन भाग महत्त्वाचे आहेत. म्हणजे या दोन्हीतला फरक जाणून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. समजा तुम्हाला भूक लागलीय. जेवण करायचं आहे. मात्र ते घरी करायचं की रेस्टॉरंटमध्ये यात तुम्हाला पर्याय निवडावा लागेल. तुम्ही कशाला प्राधान्य देता त्यावर तुमच्या पैशांची बचत (Saving) अवलंबून असते. पाहू काही महत्त्वाच्या टिप्स...

खर्चाचं बजेट किंवा नियोजन

खर्चाचं योग्य नियोजन करण्यासाठी त्याचं बजेट आधीच करून ठेवावं. यामुळे खर्चाचा ताळमेळ साधण्यास मदत होईल. हे समोर असल्यास तुमच्याकडून जास्त खर्च होणार नाही. आधी आपलं उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज बांधून मग याची सुरुवात करा. नंतर प्रत्येक गरजेसाठीची रक्कम बाजूला काढून ठेवा. याविषयी बँक बझारचे (Bankbazaar.com) सीईओ अदिल शेट्टी म्हणतात, की चतुराईनं बचत केल्यास तरलता येते. हीच तरलता गरजेच्या वेळी वापरली जाऊ शकते. आर्थिक अडचणींविरुद्ध लढण्यासाठी विमा, गुंतवणुकीवरचा चांगला परतावा, कर्जाची वेळेवर परतफेड यासर्व बाबी महत्त्वाच्या असल्या तरी स्मार्ट बचत हीच ट्रिक आपली आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यास मदत करते.

अनावश्यक खर्चात कपात

आपला एकूण खर्च किती, कोणत्या ठिकाणी खर्च वाचवता येईल हे ओळखावं. ज्याचा वापर होत नाही अशी सेवा बंद कराव्या, बाहेरचं जेवण टाळा, महागड्या नावाच्या ब्रँडपेक्षा जेनेरिक ब्रँड्सना प्राधान्य द्या.

खरेदीचं नियोजन

काय काय खरेदी करायचं आहे, हे आधीच ठरवा. कारण याचं नियोजन न केल्यास अनावश्यक खरेदीची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टी खरेदी करणं टाळून पैसे वाचविण्याचा प्रयत्न करावा. कधी कधी अचानक एखादी वस्तू खरेदी करण्याची लहर आपल्याला येते. मात्र त्याची खरं तर गरजही नसते. ही सवय खरेदीचं नियोजन आधीच केलं लागत नाही.

किंमतींची तुलना

एखाद्या वस्तूची किंमत सर्व ठिकाणी सारखीच असेल, याची शक्यता कमीच. त्यामुळे तुम्ही पाहत असलेल्या वस्तू विविध ठिकाणी किती किंमतीला उपलब्ध आहेत, हे पाहावं. बेस्ट डीलसाठी शोध घेणं आवश्यक आहे. आपल्या पैशासाठी सर्वोत्तम मूल्य मिळत असल्याची खात्री करण्यासाठी ऑनलाइन आणि स्टोअरमधल्या किंमतींची आधी तुलना करावी. हे करण्यासाठी आधीच तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे खरेदी करण्यापूर्वी संबंधित वस्तूच्या किंमतीचा अभ्यास करून मगच वस्तू खरेदी करा.

महागडी लाइफस्टाइल टाळावी

एकीकडे तुमचं उत्पन्न वाढतं, तसं तुम्ही तुमचा खर्च वाढवला तर ही लाइफस्टाइलमधली महागाई निर्माण होते. त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढत असतानाही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा.

मोठा खर्च करण्यापूर्वी विचार गरजेचा 

महागड्या वस्तूंसाठी पर्यायी व्यवस्थांचा विचार आधी करावा. म्हणजे, एखादी महागडी वस्तू खूप गरजेची नसेल तर ती विकत घेण्याऐवजी भाड्यानं घेण्याचा विचार करावा किंवा नवी घेण्याऐवजी वापरलेल्या वस्तूंचा विचार आधीच करावा.

सवलत पाहा

कोणतीही बाब खरेदी करताना त्यावरची सवलत आणि कूपन पाहावं. विविध क्रेडिट कार्डवर आजकाल ऑफर्स असतात. जसं की पेट्रोल भरण्यासाठी कार्डचा वापर केल्यास सवलत मिळेल. किंवा एखाद्या मॉलमध्ये ब्रँडवर काही ऑफर दिली जाईल. यातून पैशांची बचत होईल. फ्लाइट बुक करताना आणि इतर अनेक बाबतीत सवलतीच्या माध्यमातून पैशांची बचत होईल.

इमर्जन्सी फंड

सध्याच्या घडीला आर्थिक अडचणी नसल्या तरी भविष्यात येणार नाहीत, असं नाही. भविष्यातल्या खर्चाचं नियोजन करावं. यासाठी इमर्जन्सी फंड तयार ठेवावा. यासह सेवानिवृत्ती किंवा भविष्यातल्या इतर खर्चांसाठी बचत सुरू करावी.

तुम्ही पैशांची बचत करता तेव्हाच याचा आनंद तुम्हाला घेता येतो. तेव्हा या सर्व टिप्स फॉलो केल्या तर निश्चितच पैशांची बचत होण्यास मदत होईल.