Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyber Security Tips: सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी या 5 टिप्स नक्की फॉलो करा

Protection From Cyber Criminals

Cyber Security Tips: 2021च्या तुलनेत 2022 मध्ये ई-मेल फिशिंग 61टक्क्यांनी वाढल्याची माहिती मेसेजिंग सुरक्षा प्रदाता स्लॅशनेक्स्टच्या अभ्यासातून समोर आली आहे.

Protection From Cyber Criminals:  गेल्या एका दशकात टेक्नॉलॉजीत(Technology) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा दुसरा परिणाम असा झाला की, सायबर गुन्हांमध्ये(Cyber Crime) देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या ऑनलाईन स्कॅमपैकी(Online Scam) ई-मेल फिशिंग(Email Phishing) हा चर्चेत असणारा एक प्रकार आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये ई-मेल फिशिंग 61 टक्क्यांनी वाढल्याची माहिती मेसेजिंग सुरक्षा प्रदाता स्लॅशनेक्स्टच्या अभ्यासातून समोर आली आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार फिशिंग ईमेल पाठवतो, जे यूजर्सना बँक माहिती(Bank Details) किंवा क्रेडिट कार्ड नंबर(Credit Card Details) यासारखी गोपनीय माहिती प्रदान करण्यासाठी तयार केलेले डिझाईन असते. काही गुन्हेगार डेटा चोरण्यासाठी किंवा यूजर्सच्या सिस्टमवर मालवेअर(Malware) लॉन्च करण्यासाठी या युक्त्यांचा वापर करतो. जर यापासून तुम्हाला संरक्षण हवे असेल किंवा हे टाळण्याचा मार्ग जाणून घ्यायचा असेल तर आजच्या लेखात दिलेल्या 5 टिप्स नक्की फॉलो करा.

अनोळखी किंवा संशयास्पद ई-मेल टाळा(Avoid unknown or suspicious emails)

एखाद्या अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्तीकडून तुम्हाला ई-मेल(Email) आल्यास, त्या मेलमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही अटॅचमेंट डाउनलोड(Attachment Download) करू नका. त्याअगोदर मेल पाठवणाऱ्याची ओळख तपासण्यासाठी विविध पद्धती वापरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.

धोका ओळखायला शिका(Learn to recognize danger)

हे ईमेल्स ओळखताना काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्या. ज्यामध्ये या ईमेल्समध्ये बहुतांश वेळा खराब व्याकरण(Grammar), सेन्स ऑफ अर्जन्सी(Sense of urgency) आणि अकाउंट सस्पेन्शनबाबत(Account Suspension) लिहिलेले असते. अशा मेलमध्ये तुम्हाला तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल(Login credential) किंवा बँक खाते क्रमांक(Bank account number) यासारखी गोपनीय आणि संवेदनशील माहिती विचारण्यात येते. अशा वेळी तुम्ही ती माहिती देऊ नका.

ईमेल पाठवणाऱ्याचा अ‍ॅड्रेस व्हेरिफाय करा(Verify the email sender address)

असे सायबर गुन्हेगार बऱ्याच वेळा बनावट ईमेल अ‍ॅड्रेस वापरून पाठवले जातात, जे वैध लोकांसारखे पाहायला मिळतात. अशा कोणत्याही ईमेलला प्रत्युत्तर देण्यापूर्वी, सेंडरच्या अ‍ॅड्रेसची सत्यता तपासण्यासाठी(Email address verify) त्याची दोनदा तपासणी करून घ्या.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करा(Enable two-factor authentication)

तुमच्या अकाउंटवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा(two-factor authentication) वापर केल्याने सुरक्षिततेसाठी अधिक मदत होते. यामुळे तुमच्या पासवर्ड व्यतिरिक्त, तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमच्या फोनवर किंवा ईमेलवर पाठवलेला कोडच वापरावा लागेल.

वेळच्या वेळी सॉफ्टवेअर व  सिक्युरिटी मेजर्स अपडेट करा(Update software and security measures)

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर(Antivirus software) आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या नवीनतम आवृत्त्या वापरण्यासाठी प्राधान्य द्या, कारण यामध्ये अनेकदा नवीन धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षा पॅच समाविष्ट करण्यात आलेले असतात. तुम्ही ईमेल फिशिंग टाळण्यासाठी ही पावले उचलून तुमची गोपनीय आणि संवेदनशील माहिती सुरक्षित ठेऊ  शकता.