• 09 Feb, 2023 08:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Folding House : ‘गुंडाळून ठेवता येणारं घर’ ही फक्त संकल्पना राहिली नाहीए तर ‘इथं’ ती प्रत्यक्षात आलीय

Foldable House

Image Source : www.twitter.com

Folding House : अमेरिकेतल्या एका कंपनीने असं घर बाजारात आणलं आहे की, तुम्ही त्याची ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता. आणि मग गुंडाळून ठेवलेलं घर तुमच्या दारात, नव्हे जमिनीवर येईल. ते उघडलंत की तुमचं घर तयार. भारतातले आघाडीचे उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या मते भारतात असे प्रयोग झाले तर घरांच्या किमती परवडणाऱ्या होतील.

हल्ली आपण ऑनलाईन (Online Marketing) सगळ्याच वस्तू ऑर्डर करतो. जेवण, भाज्या, फॅशनच्या वस्तू आणि अगदी घरातलं फर्निचरही ऑनलाईन मागवतो. पण, येणाऱ्या दिवसांत कदाचित आपलं अख्खं घरंच ऑनलाईन मागवता येईल. आणि त्याची घरपोच डिलिव्हरी (Home Delivery) होईल. ही संकल्पना सध्या अमेरिकेत बॉक्सेबल (Boxabl Inc) या कंपनीने मांडली आहे. त्यांनी तिथे अशा घरांची विक्रीही सुरू केली आहे. कंपनी फोल्डेबल घरं (Foldable House) तुम्हाला पाठवून देते. आणि तुमच्या जमिनीच्या तुकड्यावर त्याची उभारणीही करते.

बॉक्सेबल (Boxabl Inc) कंपनीच्या या घरांचं नाव आहे ‘द कसिटा’ (The Casita). 500 वर्ग फूटांची ही छोटी स्टुडिओ अपार्टमेंट घरं आहेत. कंपनी अमेरिकेतल्या लास व्हेगासमधली असल्यामुळे सुरुवातीला पश्चिम किनारपट्टीच्या भागात त्यांची विक्री सुरू झालीय. मार्च 2021 पासून बॉक्सेबल कंपनीने ही घरं विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. आणि त्यांची जोरदार चर्चा अमेरिकेत सुरू आहे.

ग्राहकांनी जमीन विकत घ्यायची. तिचं सपाटीकरण करायचं. आणि पुढचं काम कंपनीचे लोक येऊन करणार. म्हणजे ते घरांच्या भिंती आणि इतर सामान तुम्हाला घरपोच करणार. आणि असं फोल्डिंगचं घर उभारूनही देणार. अमेरिकेत अशा घरांची किंमत 45,000 अमेरिकन डॉलर इतकी आहे. आणि ही किंमत तिथल्या लोकांना खूप जास्त वाटतेय. कारण, घरं 500 वर्ग फूट इतकी लहान आहे. पण, या मुद्याने भारतीय प्रथितयश उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचं लक्ष वेधलंय.

भारतात फोल्डेबल घरं येऊ शकतील? Foldable Houses in India?

आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेतल्या या फोल्डेबल घरांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी त्यांनी अशी घरं उभारतानाचा एक व्हीडिओही शेअर केला. आणि त्यानंतर ते काय म्हणाले हे खूप महत्त्वाचं आहे.

‘500 स्केअर फूटाचं घर 40,00,000 रुपयांना मिळतंय. आपण उत्पादनच भारतात सुरू केलं तर कदाचित किंमत आणखी कमी करू शकू. भारतात अशी घरं नैसर्गिक आपत्तीनंतर निवारा केंद्र म्हणूनही वापरता येतील. भारतात अशा घरांचा उपयोग मोठा आहे.’

थोडक्यात, गुंडाळून ठेवता येणाऱ्या घरांची संकल्पना भारतात उपयोगाची आहे असं त्यांना वाटतंय. आणि दुसरं म्हणजे भारतात उत्पादन सुरू झालं तर अशा घरांच्या किमती कमी होतील असा त्यांचा होरा आहे. महिंद्रा यांच्या ट्विटला भारतीय लोकांनी पसंतही दिली आहे. आणि 40 लाखांच्या वर लोकांनी या ट्विटला लाईक केलं आहे.

फोल्डेबल घरांची संकल्पना बघितली तर यात फ्रिज, बेसिन आणि इतर सोयींनी युक्त स्वयंपाकघर, तसंच हॉल आणि बेडरुम एकत्र आहेत. असं हे घर एका ट्रकमधून तुमच्या घरी येऊ शकतं.