Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Big Saving Days 2023: फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे निमित्त असणार आहे खास सेल, जाणून घ्या ऑफर्स

Flipkart

Image Source : www.flipkart.com

फ्लिपकार्ट सेल 15 जानेवारीपासून सुरू होत असून हा सेल  20 जानेवारीपर्यंत चालेल.कंपनीने त्यांच्या वेबसाईटवरून यासंबंधी माहिती दिली आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ग्राहकांना 80 टक्के पर्यंत सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्ट लवकरच एक नवीन सेल घेऊन येणार आहे. बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Day) प्रजासत्ताक दिनापूर्वीच Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरु होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर उत्पादनांवर आकर्षक सवलत उपलब्ध असणार आहे. सोबतच, फ्लिपकार्ट प्लस वापरकर्त्यांना एक दिवस आधी या सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या आगामी सेलच्या तारखा जाहीर केल्या आहेत.   

फ्लिपकार्ट सेल 15 जानेवारीपासून सुरू होत असून हा सेल  20 जानेवारीपर्यंत चालेल.कंपनीने त्यांच्या वेबसाईटवरून यासंबंधी माहिती दिली आहे. फ्लिपकार्टने सध्या बहुतांश ऑफर्स जाहीर केलेल्या नाहीत.   

बँक सवलत किती असेल?  

सेलमध्ये ICICI बँक आणि सिटी बँक कार्डांवर आकर्षक ऑफर असणार आहेत. या दोन्ही बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ग्राहकांना 10 टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के सूट मिळणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट पेचा देखील लाभ घेऊ शकतील.  

स्मार्टफोनवर मिळेल मेगा ऑफर   

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती उपलब्ध असणार आहेत. कंपनीने अद्याप या सेलमध्ये ऑफर थेट उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. परंतु, याआधीचे सेल बघता आयफोन आणि इतर स्मार्टफोन खरेदीवर मेगाऑफर मिळू शकते. तर यापूर्वी कंपनीने iPhone 14 आणि iPhone 14 Plus बद्दलचा टीझर जारी केला होता, त्यामुळे हे मोबाईल सेलमध्ये विक्रीसाठी असतील असा अंदाज वर्तवला जातो आहे.  

स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ग्राहकांना 80 टक्के सूट मिळणार आहे. त्याच वेळी, लॅपटॉप 15,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत, तर साउंडबार 999 रुपयांपासूनच्या किमतीने खरेदी करता येणार आहेत. तसेच ब्रांडेड कंपन्यांचे इअरफोन रु. 599 च्या तर स्मार्टवाच 1,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असणार आहेत.तसेच टीव्ही आणि इतर उपकरणांवर 75 टक्के सूट दिली जाणार आहे. त्याच वेळी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिनवर 55 टक्के सूट मिळवण्याची संधी देखील ग्राहकांना असेल. किचन उपकरणे रु.299 च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असतील.