Flipkart Big Diwali Sale: दिवाळीच्या निमित्ताने, Flipkart तुम्हाला मोठ्या सवलतींसह ऑनलाइन खरेदी करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देत आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट 19 ऑक्टोबरपासून बिग दिवाळी सेल 2022 (Big Diwali Sale 2022) सुरू करत आहे. या दरम्यान, कंपनी ऑनलाइन खरेदीदारांसाठी सर्व प्रॉडक्टच्या रेंजवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना 23 ऑक्टोबरपर्यंत विशेष ऑफरसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. नेहमीप्रमाणे या वर्षीही, फ्लिपकार्ट आपल्या प्लस सदस्यांना एक दिवस आधी म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून सेल ऑफरचा लाभ घेण्याची संधी देणार आहे. (Amazing Offers in Flipkart Big Diwali Sale)
या कार्ड्स आणि डिजिटल पेमेंटवर 10% सूट
बिग दिवाळी सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड युजर्सना ऑनलाईन खरेदीवर 10 टक्के झटपट सूट (discount) मिळणार आहे. याशिवाय, जे ग्राहक पेटीएम वॉलेट किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहार करून या सेलदरम्यान ऑनलाईन खरेदी करतील. त्यांनाही 10 टक्के सूट मिळणार आहे.
90% पर्यंत सूट मिळणारे प्रॉडक्ट!
iPhones, Realme, Poco, Oppo आणि Redmi या कंपन्यांचे स्मार्टफोन बिग दिवाळी सेल 2022 दरम्यान ऑफरसह खरेदी करू शकता. या सेलमध्ये, स्मार्टवॉच आणि हेडसेट यांसारख्या उपकरणांच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. सेल दरम्यान, गेमिंग लॅपटॉपला मूळ किमतीपेक्षा 40 टक्के कमी दराने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळेल. वॉशिंग मशिन, स्मार्ट टीव्ही, एअर कंडिशनर यासारख्या घरगुती गरजेच्या वस्तू मूळ किमतीपेक्षा ७५ टक्के कमी दराने फ्लिपकार्टवरून खरेदी केल्या जाऊ शकतात. फॅशन आणि कपड्यांशी संबंधित वस्तूंची खरेदीही कमी खर्चात करता येईल. लहान मुलांच्या कपड्यांवर 90% पर्यंत सूट. पुरुषांच्या कपड्यांवर आणि फॅशन घड्याळांवर 80 टक्के सूट आणि सँडलवर किमान 50 टक्के सूट मिळणार आहे.
टिकटॉक डील…
दिवाळीच्या निमित्ताने फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी रश अवर्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये डील वेळोवेळी बदलत जाईल. टिकटॉक डील (Tiktok deal) सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होतील आणि दर तासाला 12 वाजेपर्यंत बदलतील. याशिवाय क्रेझी डील्स (Crazy deal) देखील असतील. या डील्स दुपारी १२, सकाळी ८ आणि संध्याकाळी ४ वाजता सुरू होईल.