• 02 Oct, 2022 09:45

फ्लिपकार्टचा सेल! पुढील पाच दिवस मिळणार बंपर डिस्काउंट

Flipkart Big Saving Days August 2022

फेस्टिव्ह सिझनमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदीची वाट पाहत बसला असाल तर तर तुमच्यासाठी आता संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने Big Saving Days Sale या सेलची घोषणा (Flipkart Big Saving Days) केली आहे. 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान गॅझेट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

सणासुदीचा हंगाम सुरु झाला असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी बंपर ऑफर्सची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टने 'बिग सेव्हींग्ज डेज'ची (Flipkart Big Saving Days from 6th to 10th August 2022) घोषणा केली आहे. हा सेल शनिवारी 6 ऑगस्ट 2022 रोजी सुरु होणार आहे. 10 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत हा सेल सुरु राहील. यात ग्राहकांना स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, हेडफोन्स या गॅझेटसह बहुतांश वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. त्याशिवाय आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर 10% इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळणार आहे.

सेल दरम्यान गॅझेट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीच्या वेबपेजनुसार इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जास्तीत जास्त 80% पर्यंत मोठा डिस्काउंट देण्यात आला आहे. लॅपटॉप्स, टॅबलेट, गेमिंग मॉनिटर्स, हेडफोन्स आणि स्पीकर्स अशा इलेक्ट्ऱॉनिस्क वस्तूंवर 80% पर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्याशिवाय टीव्ही, मायक्रोवेव्ह, रेफ्रीजरेटर्स यावर 75% सवलत असेल.

'सेल'साठी खास तयार केली मायक्रोसाईट (Flipkart Big Saving Days) 

फ्लिपकार्टने 'बिग सेव्हींग्ज डेज'साठी खास मायक्रोसाईट तयार केली आहे. हे स्पेशल पेज वेबसाईटवर 'Rush Hours' 12 am ते 2am या दरम्यान दिसेल. बेस्ट डिल्स ऑफर्स 12am,8 am, 4 pm या वेळेत ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. याशिवाय टिक टॉक डिल्स देखील 12pm ते 10pm या वेळेत कमी किंमतीत वस्तू उपलब्ध होतील.

टॉप स्मार्टफोन्सवर मिळेल घसघशीत डिस्काउंट (Big Discount on SmartPhones)

पाच दिवस चालणाऱ्या फ्लिपकार्ट 'बिग सेव्हींग्ज डेज'मध्ये अॅपल, विवो, मोटोरोला या स्मार्टफोन ब्रॅंडवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. सध्या कंपनीच्या वेबसाईटवर अॅपलचा आयफोन 11 हा 41,999 रुपयांना तर आयफोन 12 हा 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. सेल दरम्यान, हे दोन्ही आयफोन आणखी स्वस्त असतील असे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय ओपो रेनो 8 5G आणि विवो T1 या फोनवर देखील सेल दरम्यान डिस्काउंट मिळणार आहे.