Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money planning for Youngsters: नोकरी लागल्यावर तरुणांनी पैशाचे नियोजन कसे करावे?

New job money planning

दर महिन्याला पगार झाल्यानंतर काही पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. द्वारे तुम्हाला गुंतवणूक करण्याची शिस्त लागेल. आधी बचत, गुंतवणूक मग खर्च हा फॉर्म्युला तुम्ही वापरायला हवा. सहसा आपण, पैसे खर्च केल्यानंतर बचतीचा विचार करतो. मात्र, आधी बचत आणि गुंतवणूक केल्यानंतर उरलेले पैसे खर्च करायला हवे.

कॉलेजमध्ये असताना दर महिन्याला घरुन खर्चाचे पैसे आणि पॉकेट मनी येत असल्याने बचत करण्याचा आणि आयकर परतावा भरण्याचा विचार कधी डोक्यात आला नसेल. नव्यानेच नोकरी लागल्यावर पैसे खर्च करण्याकडे तरुणांचा जास्त कल असतो. बचत, गुंतवणूक, कर नियोजन या गोष्टी त्यांच्या ध्यानीमनी नसतात. मात्र, एक दोन वर्ष नोकरी केल्यानंतरही पैसे काहीच शिल्लक नसल्याचे ध्यानात आल्यावर अनेकजण गुंतवणुकीला सुरुवात करतात. आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स हे सुद्धा गरजेचे असून आणीबाणीच्या काळासाठी नियोजन नोकरी लागल्यानंतर लगेच सुरू करायला हवे.

शेअर बाजार म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करा 

दर महिन्याला पगार झाल्यानंतर काही पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. द्वारे तुम्हाला गुंतवणूक करण्याची शिस्त लागेल. आधी बचत, गुंतवणूक मग खर्च हा फॉर्म्युला तुम्ही वापरायला हवा. सहसा आपण, पैसे खर्च केल्यानंतर बचतीचा विचार करतो. मात्र, आधी बचत आणि गुंतवणूक केल्यानंतर उरलेले पैसे खर्च करायला हवे.

आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स गरजेचा -

नोकरी करत असताना कंपनीचा जरी आरोग्य विमा असेल तर तुम्ही स्वत:चा वेगळा विमा काढला तर योग्य राहील. कारण, बऱ्याच वेळा तुम्ही कंपनी बदलता तेव्हा विमा संरक्षण जाते तेव्हा नव्याने विमा काढण्यास तुम्ही चालढकल करता. विमा काढताना अनेक आजारांसाठी वेटिंग पिरियड असतो. जर तुम्ही दरवर्षी वेगळा विमा काढत असाल तुमचा वेटिंग पिरियड संपूर्ण अधिकचे संरक्षण तुम्हाला मिळेल. क्लेम केला नाही तर नो क्लेम बोनसही तुम्हाला मिळेल. सोबतच कमी वय असताना टर्म इन्शुरन्स काढलेले तुमच्या फायद्याचे ठरेल. जस जसे वय वाढत जाते तसे टर्म इन्शुरन्सचा प्रिमियम वाढत जातो. त्यामुळे कमी वय असताना टर्म इन्शुरन्स काढला तर तुमचे कमी पैसे खर्च होतील.

निवृत्तीसाठीचे नियोजन सुरू करा -

नोकरी लागल्यानंतर तुमचे आर्थिक ध्येय ठरवून घ्या. तुम्हाला भविष्यात असणारे कोणते मोठे खर्च आहेत, त्यानुसार गुंतवणूक सुरू करा. निवृत्तीसाठीच्या नियोजनासाठीही तरुण वयापासूनच पैसे गुंतवणूक करा. कारण, लवकर सुरुवात केली तर तुमच्या निवृत्ती फंडामध्ये मोठी रक्कम जमा होईल. निवृत्तीनंतर तुम्हाला उत्पन्नाची काळजी करण्याची गरज पडणार नाही. अनेक सरकारी आणि खासगी योजना आहेत त्याद्वारे तुम्ही निवृत्तीसाठी गुंतवणूक सुरू करू शकता.

ओल्ड टॅक्स आणि न्यू टॅक्स रिजिम - 

पहिल्यांदाच इनकम टॅक्स रिटर्न भरताना ओल्ड टॅक्स किंवा न्यू टॅक्स रिजिममधून रिटर्न भरावा यात तुमचा गोंधळ उडू शकतो. न्यू टॅक्स रिजिम 2022 च्या अर्थसंकल्पापासून सुरू करण्यात आला होता. नव्या टॅक्स रिजिममध्ये दोन महत्त्वाचे बदल आहेत. एक. यात कमी करांचे अधिक टप्पे (स्लॅब) आहेत. दुसरे म्हणजे ओल्ड रिजिम नियमांनुसार असलेले फायदे नव्या टॅक्स रिजिममध्ये नाहीत.

नव्या टॅक्स रिजिमनुसार कर जरी कमी आकारण्यात येत असला तरी यामध्ये 80C आणि 80CCD अंतर्गत करात सूट मिळत नाही. घरभाडे, लिव ट्रॅव्हल अलाऊंन्सची सूट यामध्ये नाही. ओल्ड टॅक्स रिजिमनुसार तुम्हाला जास्त फायदे मिळू शकतात. या बाबत सखोल माहिती घेतल्यानंतरच तुम्ही ट्रॅक्स रिजिम निवडायला हवा.

सॅलरी स्पीप समजून घ्या

कर नियोजन करताना सर्वात आधी तुमची सॅलरी स्लीप समजून घ्या. नव्याने नोकरी सुरू केल्यानंतर पगारातून किती पैसे कशासाठी कापले जात आहेत याची माहिती बऱ्याच जणांना नसते. नेट सॅलरी, ग्रॉस सॅलरी म्हणजे काय? CTC म्हणजेच कॉस्ट टू कंपनीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, हे समजून घ्या. HRA, LTA ला करामधून सुटका आहे का? याची माहिती मिळवा.

इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरतात ते शिकून घ्या?

आयकर परतावा भरण्याचे विविध पर्याय आहेत. incometaxindia.gov.in साईटवर जाऊनही तुम्ही रिटर्न भरू शकता किंवा सीएकडे जाऊनही तुम्ही टॅक्स रिटर्न फाइल करु शकता. टॅक्स रिटर्न भरण्यासाठी सहाय्य करण्यासाठी अनेक मध्यस्थी कंपन्या आहेत. त्या तुम्ही www.tin-nsdl.com संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.