बँकिंग सेवा मोबाईलवर आल्यानंतर त्यात दररोज बदल होत आहेत. आता व्हॉट्सअप थेट मुदत ठेव करण्याची सोय एका फिनटेक कंपनीने उपलब्ध केली आहे. फिक्स्ड इन्व्हेस्ट या कंपनीने व्हॉट्सअपवर मुदत ठेवीची सुविधा उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे हे फिक्स्ड डिपॉझिट सुरु करताना बचत खात्याची आवश्यकता नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
सुरक्षित आणि स्थिर परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना केवळ व्हॉट्सअप फिक्स्ड डिपॉझिट करता येणार आहे. फिक्स्ड इन्व्हेस्ट ही एक व्हॉट्सअपवरील मार्केटप्लेस आहे. गुंतवणूकदारांसाठी या कंपनीने थेट व्हॉट्सअपवर फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय आणला आहे. केवळ एका क्लिकवर व्हॉट्सअप युजरला हवी ती रक्कम एफडी करता येईल.
गुंतवणूकदाराला व्हॉट्सअपवर 'बेटर एफडी' इंटरफेस सुरु करता येईल. त्यात आवश्यक माहिती सादर केली त्यात बँकांच्या एफडी योजना आणि त्यावरील व्याजदराची माहिती उपलब्ध होईल. यात इन्व्हेस्ट नाऊ यावर क्लिक केल्यानंतर गुंतवणूकदार कंपनीच्या एफडी बुकिंगच्या अधिकृत पोर्टलवर जातो.
नुकताच सरकारने डेब्ट म्युच्युअल फंडावरील कर सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे डेब्ट फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग आता स्थिर परतावा देणाऱ्या पर्यांयाचा शोध घेत आहे. अशात फिक्स्ड डिपॉझिट एक चांगला पर्याय पुन्हा लोकप्रिय होत असल्याचे फिक्स्ड इन्व्हेस्टचे संस्थापक अक्षर शहा यांनी सांगितले.
बेटर एफडी या सुविधेने मुदत ठेव करणे आता आणखी सोपे झाले असल्याचे शहा यांनी सांगितले. बेटर एफडी ही रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेल्या बँका आणि सहकारी बँकांचे मुदत ठेवींचे पर्याय उपलब्ध करते. त्याशिवाय काही निवडक फिक्स्ड डिपॉझिटवर गुंतवणूकदाराला कॅशबॅक देखील मिळतो, असे शहा यांनी सांगितले.
शहा पुढे म्हणाले की या व्हॉट्सअप एफडी सेवेमध्ये गुंतवणूकदाराला नवीन बचत खाते सुरु करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा मुदत ठेवीची पूर्तता होते तेव्हा पेसै युजर्सच्या मूळ खात्यात जमा केले जातात, असे शहा यांनी सांगितले. सध्या फिक्स्ड इन्व्हेस्ट या मार्केटप्लेसवर तीन खासगी बँका आणि तीन सहकारी बँका तसेच दोन स्मॉल फायनान्स बँकांच्या मुदत ठेवींचा पर्याय उपलब्ध आहे.