Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Cars to Buy in 2022: सर्वोत्तम इंजिनसह या बजेट कारची किंमत माहित करून घ्या

Budget Cars to Buy in 2022

Budget Cars to Buy in 2022: नवीन कार घेण्याचा विचार करत आहात का? जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर काही बेसिक गोष्टी लक्षात घ्या. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे इंजिन. भारतातील सर्वोत्तम इंजिन budget cars to buy in indiaअसलेल्या कार तुमच्यासाठी, अधिक माहितीसाठी वाचा.

Budget Cars to Buy in 2022: नवीन कार घेण्याचा विचार करत आहात?  जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर काही बेसिक गोष्टी लक्षात घ्या. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे इंजिन. तुम्ही सर्वोत्तम इंजिन असलेली कार निवडणे महत्त्वाचे आहे. खराब इंजिन असलेली कार ही फटाक्यासारखी असते. सर्वोत्तम इंजिन आणि तुमच्या बजेटमध्ये (Best budget cars)असलेल्या काही कार पुढीलप्रमाणे, अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

स्कोडा स्लाव्हिया 1.5 (Skoda Slavia 1.5)

स्कोडा स्लाव्हिया दोन इंजिन ऑप्शनसह येते, एक 1.5 लिटर TSi इंजिन जे 115Hp पॉवर जनरेट करते आणि दुसरे 1.5 लिटर इंजिन जे 150HP पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत ₹16.79 लाख ते ₹18.39 लाख दरम्यान आहे.

Skoda Slavia
https://autos.maxabout.com/

ह्युंदाई i20 N-लाइन (Hyundai i20 N-Line)

hyundai i20 n line
https://www.hyundai.com/

ही कार आधीपासूनच एक लिटर तीन-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. यात कडक सस्पेंशन सेट-अप, स्पोर्टियर एक्झॉस्ट आणि शार्प स्टीयरिंग आहे. i20 N-Line चे चेसिसमध्ये काही बदल झाले आहेत. हे सात-स्पीड डीसीटी आणि सहा-स्पीड आयएमटी गिअरबॉक्ससह सादर केले आहे. त्याची किंमत ₹10 लाख ते ₹12.11 लाख दरम्यान आहे. कार घेण्यासाठी उत्तम वेळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना असतो. 


होंडा सिटी 1.5 (पेट्रोल) (Honda City 1.5 (Petrol)

या सेडानची किंमत 11.57 लाख ते 15.32 लाख रुपये आहे. सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह त्याचे NA इंजिन हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, यात सहा-स्पीड ऑटोमॅटिक पर्यायही सादर करण्यात आला आहे.

Honda City
https://www.carwale.com/

 महिंद्रा XUV300 टर्बोस्पोर्ट (Mahindra XUV300 TurboSport)

महिंद्राच्या XUV300 टर्बोस्पोर्टला नवीन 1.2 लीटर तीन-सिलेंडर mStallion Turbo-Petrol इंजिनसह अपग्रेड करण्यात आले आहे. हे नवीन इंजिन 131 Hp पॉवर आणि 230 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे हाय-रेव्हिंग इंजिन नाही. त्याची किंमत 10.35 लाख ते 12.9 लाख रुपये आहे.

Mahindra XUV300 Turbo Sport
https://www.cardekho.com/

सायट्रोन C3 (Citroen C3)

Citroen C3
https://www.citroen.in/

Citroen C3 ची किंमत ₹5.88 लाख ते ₹8.15 लाख दरम्यान आहे. यात 1.2 लीटर थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन पॅक आहे. हे 110 Hp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सणासुदीच्या काळात आणि वर्षाच्या अखेरीस कारवर भरपूर डिस्काउंट असतात.