Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Automatic Cars: भारतात लोकप्रिय ठरलेल्या 5 स्वस्त ऑटोमॅटिक कार्सबाबत माहिती जाणून घ्या

Automatic Cars

5 Cheap Automatic Cars: भारतात दिवसेंदिवस ऑटोमॅटिक कारची मागणी वाढत आहे. कार विकत घेत असतांना कार प्रेमींचा कल, ऑटोमॅटिक कार विकत घेण्याकडेच असतो. कारण, अतीशय वर्देळीच्या ठिकाणी देखील ऑटोमॅटिक कार चालविणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला, भारतात विकल्या जाणाऱ्या पाच स्वस्त अश्या ऑटोमॅटिक कार बाबत माहिती देणार आहोत.

भारतात ऑटोमॅटिक कार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. कारण, अतिशय वर्देळीच्या ठिकाणी देखील ऑटोमॅटिक कार चालविणे चालकांना सोपे जाते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारला क्लच पेडल किंवा मॅन्युअल गिअर शिफ्टिंगची आवश्यकता नसते. त्यामुळे अशा कार्सला सर्वाधिक पसंती दिसून येते.अगदी बेस्ट अशा ऑटोमॅटिक कार विकत घेणे सगळ्यांनाच परवडणारे नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भारतात विकल्या जाणाऱ्या पाच स्वस्त अशा ऑटोमॅटिक कार्सबाबत माहिती देणार आहोत.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

Maruti Suzuki S-Presso आणि अल्टो K10 या दोन्ही गाड्यांची ऑटोमॅटिक यंत्रणा जवळपास सारखी आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसो मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स, AMT (AGS) ऑप्शनसह 1.0 लीटर NA इंजीन देण्यात आले आहे.  Maruti Suzuki S-Presso च्या ऑटोमॅटिक वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.76 लाख रुपये आहे.

मारुति सुझुकी ऑल्टो K10

Maruti Suzuki Alto K10 भारतातील सगळ्यात स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे. यामध्ये 1.0-लीटर NA पेट्रोल इंजीन आहे, जे  65.7 बीएचपी आणि 89 एनएम जनरेट करतो. या गाडीचे इंजीन  5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स आणि एएमटी (एजीएस) सह येते. मारुति सुझुकी ऑल्टो K10 या ऑटोमैटिक वेरिएंट ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपये आहे.

टाटा Tiago

Tata Tiago ही टाटा कंपनीची सर्वात परवडणारी गाडी आहे. यात 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन आहे, जे 84bhp आणि 113Nm जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड एमटी आणि एएमटीचा पर्याय आहे. या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 6.92 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट क्विड

Renault Kwid दोन इंजिन पर्यायांसह येते. एक म्हणजे 800cc युनिट आणि दुसरे म्हणजे 1.0-लिटर युनिट. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स लहान इंजिनसह उपलब्ध आहे. तर मोठे इंजिन AMT पर्यायाने सुसज्ज आहे. Renault Kwid च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.12 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर

Maruti Suzuki WagonR ही अत्यंत परवडणारी कार आहे. यात दोन इंजिन पर्याय आहेत. पहिले 1.0-लिटर युनिट आणि दुसरे 1.2-लिटर युनिट आहे. कारला 5-स्पीड MT आणि AMT चा पर्याय मिळतो. Maruti Suzuki WagonR च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.55 लाख रुपये आहे.